एक्स्प्लोर

Devdutt Padikkal : ऑस्ट्रेलियात फेल पण भारतात येताच पठ्ठ्याने कसली कंबर! ठोकले तुफानी शतक, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघात होणार निवड?

क्रिकेट जगतात सध्या एकीकडे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची आतुरतेने वाट पाहिली जात आहे.

Devdutt Padikkal century in Vijay Hazare Trophy 2024-25 : क्रिकेट जगतात सध्या एकीकडे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची आतुरतेने वाट पाहिली जात आहे, तर दुसरीकडे चाहत्यांच्या नजरा या मेगा इव्हेंटसाठी निवडल्या जाणाऱ्या संघाकडे आहेत. येत्या काही दिवसांत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय क्रिकेट संघाची निवड होणार आहे. दरम्यान, आणखी एका फलंदाजाने टीम इंडियामध्ये स्थान मिळवण्यासाठी आपली दावेदारी ठोकली आहे.

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी एकदिवसीय स्पर्धा असलेल्या विजय हजारे ट्रॉफी 2024-25 च्या क्वार्टर फायनल सामन्यात टीम इंडियाच्या स्टार फलंदाज देवदत्त पडिक्कलने जबरदस्त शतक झळकावले. देवदत्त पडिक्कलला 2024-25 च्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये फक्त एकाच कसोटीत संधी मिळाली. ज्याने शनिवारी विजय हजारे ट्रॉफीच्या क्वार्टर फायनल सामन्यात शानदार शतक झळकावले.

देवदत्त पडिक्कलने ठोकले शतक 

बडोद्याविरुद्ध खेळल्या जात असलेल्या या सामन्यात कर्नाटक संघाकडून खेळणारा सलामीवीर देवदत्त पडिक्कलने शतक झळकावले. या सामन्यात त्याने 99 चेंडूंचा सामना केला आणि 15 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 102 धावा केल्या. पडिक्कलचे लिस्ट ए क्रिकेट कारकिर्दीतील हे नववे शतक आहे. या खेळीनंतर त्याने आता इंग्लंड दौऱ्यासाठी आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीही आपला दावा केला आहे.

देवदत्त पडिक्कल त्याच्या लिस्ट ए कारकिर्दीत जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आतापर्यंत त्याने 31 सामन्यांपैकी 30 डावात 9 शतके झळकावली आहेत. याशिवाय, पडिक्कलने 11 अर्धशतकेही झळकावली आहेत. तो ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय आणि ज्या फॉर्ममध्ये आहे, त्यावरून त्याने भारतीय क्रिकेट संघासाठी एक मोठा फलंदाज होण्याचे संकेत दिले आहेत. आता त्याला भारतीय संघात नियमित संधी कधी मिळणार हे येणाऱ्या काळात कळेल.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पडिक्कल फेल

पडिक्कल गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाचा भाग होता. कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत त्याला बॉर्डर गावसकर ट्रॉफीचा पहिला सामना खेळण्याची संधी मिळाली. जिथे तो पूर्णपणे फ्लॉप ठरला. पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 23 चेंडू खेळल्यानंतर पडिक्कल खाते न उघडताच बाद झाला. दुसऱ्या डावात त्याने 71 चेंडूत 25 धावा केल्या.

हे ही वाचा - 

SA20 Video : ...याला म्हणतात नशीब! सामना पाहण्यासाठी आलेला चाहता काही सेकंदात झाला लखपती, नक्की घडलं काय? पाहा Video

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याला ह्रदयविकाराचा झटका; प्रकृती गंभीर, तातडीनं रुग्णालयात दाखल
प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याला ह्रदयविकाराचा झटका; प्रकृती गंभीर, तातडीनं रुग्णालयात दाखल
Mutual Fund : सेबीचं छोट्या गुंतवणूकदारांसाठी मोठं पाऊल, 250 रुपयांची SIP आणणार, म्युच्यूअल फंडमध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढणार
सेबीचं छोट्या गुंतवणूकदारांसाठी मोठं पाऊल, 250 रुपयांची SIP आणणार, म्युच्यूअल फंडमध्ये पैसा वाढणार
Manikrao Kokate : भुजबळ साहेबांना माहितीय, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला माझ्याकडे उत्तर, पण...; नेमकं काय म्हणाले माणिकराव कोकाटे?
भुजबळ साहेबांना माहितीय, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला माझ्याकडे उत्तर, पण...; नेमकं काय म्हणाले माणिकराव कोकाटे?
ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा! माणिकराव कोकाटेंनी सगळंच काढलं; म्हणाले, 'त्यांनी उघडं लढावं की कपडे...
ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा! माणिकराव कोकाटेंनी सगळंच काढलं; म्हणाले, 'त्यांनी उघडं लढावं की कपडे...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suresh Dhas on MCOCA : अजून बऱ्याच लोकांवर मकोका लागणार...सुरेश धसांचा रोख कुणावर?Jitendra Awhad Shivsena : ठाकरे गटाचा निर्णय योग्य नाही, जितेंद्र आव्हाड यांची पहिली प्रतिक्रियाSanjay Raut Full PC : मविआत भूकंप करणारी घोषणा! संजय राऊत काय म्हणाले? ABP MAJHAShivsena UBT Corporation Elections : महापालिकेत आम्ही स्वबळावर लढणार, Sanjay Raut यांची घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याला ह्रदयविकाराचा झटका; प्रकृती गंभीर, तातडीनं रुग्णालयात दाखल
प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याला ह्रदयविकाराचा झटका; प्रकृती गंभीर, तातडीनं रुग्णालयात दाखल
Mutual Fund : सेबीचं छोट्या गुंतवणूकदारांसाठी मोठं पाऊल, 250 रुपयांची SIP आणणार, म्युच्यूअल फंडमध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढणार
सेबीचं छोट्या गुंतवणूकदारांसाठी मोठं पाऊल, 250 रुपयांची SIP आणणार, म्युच्यूअल फंडमध्ये पैसा वाढणार
Manikrao Kokate : भुजबळ साहेबांना माहितीय, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला माझ्याकडे उत्तर, पण...; नेमकं काय म्हणाले माणिकराव कोकाटे?
भुजबळ साहेबांना माहितीय, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला माझ्याकडे उत्तर, पण...; नेमकं काय म्हणाले माणिकराव कोकाटे?
ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा! माणिकराव कोकाटेंनी सगळंच काढलं; म्हणाले, 'त्यांनी उघडं लढावं की कपडे...
ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा! माणिकराव कोकाटेंनी सगळंच काढलं; म्हणाले, 'त्यांनी उघडं लढावं की कपडे...
संजय राऊतांचं संतुलन बिघडलंय, ते स्वतंत्र लढू किंवा एकमेकांच्या डोक्यावर राहून लढू, आम्हाला चिंता नाही, विखे पाटलांचा हल्लाबोल  
संजय राऊतांचं संतुलन बिघडलंय, ते स्वतंत्र लढू किंवा एकमेकांच्या डोक्यावर राहून लढू, आम्हाला चिंता नाही, विखे पाटलांचा हल्लाबोल  
ठाकरे गटाकडून निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा, संजय राऊतांच्या घोषणेवर मविआत काँग्रेसचा होकार, तर राष्ट्रवादीचा वेगळा सुर
ठाकरे गटाकडून मनपा निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा, संजय राऊतांच्या घोषणेवर मविआच्या नेत्यांची प्रतिक्रिया
Mutual Fund : 1000 रुपयांच्या SIP नं गुंतवणूक सुरुवात केल्यास 1 कोटी रुपयांचा निधी किती वर्षात जमा होईल, जाणून घ्या समीकरण
एक हजार रुपयांच्या एसआयपीनं गुंतवणूक सुरु केल्यास कोट्यधीश व्हायला किती वर्ष लागू शकतात? जाणून घ्या समीकरण
Chandra Arya : कॅनडाच्या साक्षीला भारतीय 'चंद्र' लाभणार? धारवाडमध्ये शिक्षण, कर्नाटक ते कॅनडा प्रवास करत पीएम पदासाठी दावेदारी केलेले चंद्र आर्य आहेत तरी कोण?
कॅनडाच्या साक्षीला भारतीय 'चंद्र' लाभणार? धारवाडमध्ये शिक्षण, कर्नाटक ते कॅनडा प्रवास करत पीएम पदासाठी दावेदारी केलेले चंद्र आर्य आहेत तरी कोण?
Embed widget