Shahbaz Ahmed : पहिल्या आंतरराष्ट्रीय विकेटचा आनंदच काही और! शाहबाज अहमदचं सेलिब्रेशन पाहिलंत का?
Shahbaz Ahmed Celebration : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातून भारतीय एकदिवसीय संघात पदार्पण करणाऱ्या शाहबाज अहमदनं पहिल्याच सामन्यात विकेट देखील घेतली आहे.
Shahbaz Ahmed Maiden Wicket : भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात सुरु एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना रांची येथे खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल झाले असून युवा अष्टपैलू शाहबाज अहमद (Shahbaz Ahmed) आयपीएल गाजवल्यानंतर आता टीम इंडिया गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. आजच्या सामन्यात त्याचं एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण झालं आहे. दरम्यान सामन्याला सुरुवात होताच शाहबाजने 10 व्या षटकात दक्षिण आफ्रिकेच्या सलामीवीराला पायचीत करत तंबूत धाडलं. विशेष म्हणजे ही त्याची पहिलीच आंतरराष्ट्रीय विकेट असल्याने त्याच्यासह संपूर्ण संघ आनंदी दिसत होता.
तर 9 व्या षटकातील 5 वा चेंडू शाहबाजनं जनेमान मलान याला टाकला. चेंडू थेट मलानच्या पायाला लागला. ज्यामुळे शाहबाजने एलबीडब्यूची अपील केली. पण अंपायरने नाबाद असा निर्णय दिला. ज्यानंतर शाहबाजच्या म्हणण्यावर कर्णधार शिखरने रिव्ह्यूय घेतला. ज्यानंतर मलानला थर्ड अंपायरनं बाद घोषित केलं. ज्यानंतर मात्र शाहबाजच्या आनंदाला सीमा राहिली नाही. त्याने अगदी हवेत उडी घेत एखाद्या लहान मुलाप्रमाणे आनंद साजरा केला. हा व्हिडीओही बीसीसीआयनं पोस्ट केला आहे आणि पहिल्या विकेटची फिलिंग असं कॅप्शनही दिलं आहे.
That First Wicket Feeling! 🙌 🙌
— BCCI (@BCCI) October 9, 2022
Here's how debutant Shahbaz Ahmed scalped his maiden wicket in international cricket 🎥 🔽 #TeamIndia | @mastercardindia
Follow the match ▶️ https://t.co/6pFItKiAHZ
Don’t miss the LIVE coverage of the #INDvSA match on @StarSportsIndia. pic.twitter.com/Rq9vRyEWCo
कोण आहे शाहबाज अहमद?
शाहबाज अहमद देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालकडून खेळतो. त्यानं भारतीय ए संघाचंही प्रतिनिधित्व केलंय. शाहबाज हा स्लो लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स गोलंदाज आहे. तो संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळतो. त्याच्या देशांतर्गत क्रिकेट कारकिर्दीवर नजर टाकल्यास तो प्रभावी ठरला आहे. शाहबाजनं प्रथम श्रेणी सामन्यांच्या 29 डावांमध्ये 1 हजार 41 धावा केल्या आहेत. ज्यात एक शतक आणि सात अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याच्या नावावर 57 विकेट्सचीही नोंद आहे. शाहबाजनं लिस्ट ए मध्ये 26 सामने खेळले आहेत. यामध्ये त्यानं 662 धावा केल्या आहेत. ज्यात दोन शतक आणि दोन अर्धशतकांसह 14 विकेट्सची नोंद आहे. एवढेच नव्हे तर, त्यानं आयपीएलमध्येही 29 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 13 विकेट्स घेण्यासोबत 279 धावा केल्या आहेत.
हे देखील वाचा-