CSA T20 League : फाफ डू प्लेसिस जोहान्सबर्ग सुपर किंग्सचा कर्णधार, मोईन अलीसह महेश तीक्ष्णाही संघात
Faf Du Plessis : फाफ डू प्लेसिस जोहान्सबर्ग सुपर किंग्सचा कर्णधार असणार असून स्टीफन फ्लेमिंग कोच असणार आहे.
CSA T20 League, Faf Du Plessis : दक्षिण आफ्रिकेतील आयपीएल म्हणजेच दक्षिण आफ्रिका टी20 लीग (South Africa T20 League) स्पर्धेची तयारी अगदी जोरदार सुरु आहे. विविध संघ आपल्या खेळाडूंची यादी जाहीर करत असून जोहान्सबर्ग सुपर किंग्सने (Johannesburg super kings) फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) याला आपलं कर्णधार म्हणून घोषित केलं आहे. चेन्नई सुपर किंग्स (CSK) स्पोर्ट्स लिमिटेडने 375,000 डॉलर्सची किंमत मोजून फाफला संघात सामिल केलं आहे. आयपीएलमध्ये (IPL) रॉयल चँलेंजर्स बंगळुरुचा (Royal Challengers Bangalore) खेळाडू असणारा फाफ आधी सीएसकेमध्येच होता आता दक्षिण आफ्रिकेत तो पुन्हा सुपरकिंग्ससोबत जोडला गेला आहे.
फाफ डू प्लेसीसनं 69 कसोटी, 143 एकदिवसीय, 50 टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचं प्रतिनिधित्व केलं आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 4 हजार 163 धावांची (10 शतक, 21 अर्धशतक) नोंद आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यानं 5 हजार 507 धावा (12 शतक, 35 अर्धशतक) केल्या आहेत. तर, टी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 1 हजार 528 धावा (1 शतक, 10 अर्धशतक) केल्या आहेत. आयपीएलमध्ये फाफ डू प्लेसीसनं 116 सामन्यात 2 हजार 606 धावा केल्या आहेत. ज्यात 25 अर्धशतकांचा समावेश आहे.
मोईन अली आणि महेश तीक्ष्णाही जोहान्सबर्ग सुपर किंग्समध्ये
आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्समध्ये असणारे मोईन अली आणि महेश तीक्ष्णा हे दोघेही जोहान्सबर्ग सुपर किंग्समध्ये असणार आहेत. संघ सध्या 5 खेळाडूंना करारबद्ध करु शकते. अशामध्ये गवर्निंग बॉडीने 30 आंतरराष्ट्रीय खेळाडूंची यादी दिली असून यातून तीन खेळाडूंसह एक स्थानिक खेळाडू आणि एक अनकॅप्ड खेळाडू संघात घ्यावा लागणार आहे. अशामध्ये जोहान्सबर्ग सुपर किंग्सने मोईन अली आणि महेश तीक्ष्णा यांना अनुक्रमे 400,000 आणि 200,000 डॉलर खर्च करुन घेतले आहे.
मुंबईचा संघही आहे दमदार
अफगाणिस्तानचा स्टार लेग स्पिनर राशीद खान (Rashid Khan), दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा (Kagiso Rabada) आणि इंग्लंडचा विस्फोटक फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोन (Liam Livingstone) मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहेत, अशी माहिती आकाश अंबानीनं (Akash Ambani) दिलीय. दक्षिण आफ्रिका टी-20 लीगमध्ये हे सर्व खेळाडू मुंबई इंडियन्स केप टाऊन संघाचं प्रतिनिधित्व करताना दिसणार आहेत.
हे देखील वाचा-