FIFA WC 2022: पोर्तुगाल फुटबॉल विश्वचषकातून बाहेर; वर्ष 2019 आणि जर्सी क्रमांक 7 ची सर्वांना आठवण, कारण काय?
FIFA World Cup 2022: कतारमध्ये सुरु असलेल्या फुटबॉल विश्वचषकात (FIFA WC 2022) अनेक उलेटफेर पाहायला मिळाले.
FIFA World Cup 2022: कतारमध्ये सुरु असलेल्या फुटबॉल विश्वचषकात (FIFA WC 2022) अनेक उलेटफेर पाहायला मिळाले. या स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्येही अशाच काही गोष्टी पाहायला मिळाल्या, जिथे मोरोक्कोनं (Morocco) स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचा (Cristiano Ronaldo) संघ पोर्तुगालचा (Portugal) 1-0 असा पराभव केला. या पराभवामुळं रोनाल्डोचं विश्वचषक जिंकण्याचं स्वप्नही भंगलं. रोनाल्डो हा 7 नंबरची जर्सी घालून खेळतो. पराभवानंतर रोनाल्डो खूपच निराश दिसत होता. त्याच्या अनेक निराशाजनक प्रतिक्रियाही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
पोर्तुगालच्या पराभवानंतर सोशल मीडियावर जर्सी क्रमांक 7 आणि वर्ष 2019 तुफान व्हायरल होत आहे. रोनाल्डोमुळं जर्सी क्रमांक सोशल मीडियावर व्हायरल होतंय. पण 2019 चं वर्ष व्हायरल होण्यामागं नेमकं काय कारण असेल? हे जाणून घेऊयात. 2019 च्या विश्वचषकातील उपांत्य फेरीत भारताला न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता. जो पर्यंत धोनी मैदानात उभा होता, तोपर्यंत भारताच्या विजयाच्या आशा जिवंत होत्या. परंतु, त्याच्या रनआऊटनंतर भारताचं विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न भंगलं. हा सामना महेंद्रसिंह धोनीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला.
ट्वीट-
Life has been very cruel to jersey no.7 pic.twitter.com/yl1PRdE14j
— Surbhi🇮🇳🚩 (@SurCasticSurbhi) December 10, 2022
ट्वीट-
Jersey no. 7 pic.twitter.com/z0WCBExTTv
— Marlboro 🔥🇮🇳 (@166Marlboro) December 10, 2022
ट्वीट-
Jersey No - 7 did not deserves this endings 💔 pic.twitter.com/Q6AZs0DbzG
— Suresh (@isureshofficial) December 11, 2022
ट्वीट-
Jersey no.7 deserved better farewell 💔 pic.twitter.com/Ml7qhiTJpM
— Antara (Niharika) Amonkar (@theamonkar) December 10, 2022
महेंद्रसिंह धोनीची 7 क्रमांकाची जर्सी
ख्रिस्तियानो रोनाल्डोप्रमाणेच भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या जर्सीचा क्रमांकही 7 आहे. सातव्या क्रमांकाच्या जर्सीसोबतच दोन्ही खेळाडू विश्वचषकात आपल्या संघाला पुढं नेऊ शकले नाहीत. जिथे भारतीय संघ उपांत्य फेरीत पराभूत झाला होता. त्याचवेळी पोर्तुगालला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरं जावं लागलंय.
हे देखील वाचा-