रोहित शर्मानं वांद्र्यातलं अपार्टमेंट दिलं भाड्यानं, महिन्याला मिळणार 3 लाख रुपये
Rohit Sharma Apartments : भारताचा कर्णधार रोहित शर्मा सध्या इंग्लंडविरोधातील (IND vs ENG) कसोटी मालिकेत व्यस्त आहे. 25 जानेवारीपासून भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे.
Rohit Sharma Apartments : भारताचा कर्णधार रोहित शर्मा सध्या इंग्लंडविरोधातील (IND vs ENG) कसोटी मालिकेत व्यस्त आहे. 25 जानेवारीपासून भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. त्याआधीच रोहित शर्माच्या (Rohit Sharma) अपार्टमेंटसंदर्भात बातमी समोर आली आहे. रोहित शर्मानं बांद्रा (Rohit Sharma bandra) येथील दोन अपार्टमेंट रेंटवर दिले आहेत. रोहित शर्मानं बांद्रा पश्चिम येथील आपली दोन अपार्टमेंट रेंटवर दिली आहेत. Zapkey.com नुसार, रोहित शर्माला प्रत्येक महिन्याला तीन लाख रुपयांचं भाडं मिळणार आहे. भाडेकरुसोबत रोहित शर्माने तीन वर्षांसाठी करार केलेला आहे. (Rohit Sharma Leases 2 Apartments In Bandra, Mumbai)
तीन वर्षांचा करार, महिन्याला 3 लाखांपेक्षा जास्त भाडं -
Zapkey.com च्या माहितीनुसार, रोहित शर्मानं बांद्रा पश्चिममधील अपार्टमेंटसाठी भाडेकरुसोबत तीन वर्षांचा करार केला आहे. पहिल्यावर्षी प्रतिमहिना 3.1 लाख रुपये रेंट द्यावं लागणार आहे. तर दुसऱ्यावर्षी यामध्ये वाढ होऊन 3.25 लाख प्रतिमहिना आणि तिसऱ्या वर्षी 3.41 लाख प्रतिमहिना रेंट मिळणार आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हा करार पार पडलाय. रोहित शर्माच्या घराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
View this post on Instagram
9.3 लाखांचं डिपॉझिट -
4 जानेवारी 2024 रोजी रोहित शर्मानं भाडेकरुसोबत अपार्टमेंटसाठी करार केला आहे. रोहित शर्माला दोन अपार्टमेंटसाठी 9.3 लाख रुपयांचं डिपॉझिट मिळालं आहे. रोहित शर्मानं 14 व्या मजल्यावर 1047 स्क्वेअरफूट ( 616 आणि 431) इतकं मोठं अपार्टमेंट रेंटवर दिलं आहे. दरम्यान, रोहित शर्माने 2022 मध्ये हीच दोन अपार्टमेंट प्रतिमहिना 2.5 लाख रुपयांनी भाड्याने दिलं होतं.
वरळीत 30 कोटींचं घर -
भारताचा कर्णधार रोहित शर्माचं वरळीमध्ये 30 कोटींचं घर आहे. 6000 चौरस फूट घर रोहित शर्माने 2015 मध्ये खरेदी केले होते. रोहित शर्मा राहत असलेल्या अपार्टमेंटमध्ये विराट कोहली, युवराज सिंह यांचीही घरं आहेत. रोहित शर्मा आणि रितिकाच्या पोस्टमधून घराचे फोटो अनेकदा समोर आले आहेत.
रोहित शर्माची संपत्ती -
Sportskeeda नुसार भारताचा कर्णधार रोहित शर्माची एकूण संपत्ती $18.7 दशलक्ष असण्याचा अंदाज आहे. म्हणजेच भारतीय रुपायत रोहित शर्माची संपत्ती अंदाजे 130 कोटी INR इतकी आहे. क्रिकेट सामन्यांव्यतिरिक्त, लोकप्रिय क्रिकेटपटूची कमाई आयपीएल, ब्रँड एंडोर्समेंट आणि इतर डीलमधून देखील होते.
आणखी वाचा :
Virat Kohli Replacement : विराटच्या जागी कुणाला संधी मिळणार, 'या' 5 नावांवर BCCI करतेय विचार!