COVID-19 : क्रुणाल पंड्यापाठोपाठ टीम इंडियाचे आणखी दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह
COVID-19 : क्रुणाल पंड्यापाठोपाठ टीम इंडियाचे आणखी दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झालं आहे. दोनही खेळाडूंना सध्या क्वॉरंटाईन करण्यात आलं आहे.
COVID-19 : श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियावरील कोरोनाचा विळखा आता आणखी वाढत आहे. क्रुणाल पंड्यापाठोपाठ आता टीम इंडियाच्या आणखी दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. क्रुणाल पंड्यानंतर चहल आणि गौतम दोघेही कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. क्रुणाल पंड्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या ज्या 8 खेळाडूंना क्वॉरंटाईन करण्यात आलं होतं. त्यामध्ये चहल आणि गौतम या दोघांचाही समावेश होता. सध्या चहल आणि गौतम क्वॉरंटाईन आहेत. दरम्यान, यापूर्वी 27 जुलै रोजी क्रुणाल पंड्याला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं.
चहल आणि के. गौतम या दोघांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर असं सांगितलं जात आहे की, दोघांचाही अहवाल निगेटिव्ह येईपर्यंत ते क्रुणाल पंड्यासोबत श्रीलंकेतच राहणार आहेत. तसेच इतर सहा खेळाडू, हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, पृथ्वी शॉ, मनीष पांडे आणि इशान किशन. हे सर्वजण आज भारतात परतण्यासाठी निघणार आहेत. ESPN क्रिकइंफोनं दिलेल्या माहितीनुसार, चहल आणि गौतम यांचा कोरोना अहवाल गुरुवारी निगेटिव्ह आला होता, पण शुक्रवारी करण्यात आलेल्या टेस्टमध्ये हे दोघेही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झालं आहे.
क्रुणाल पंड्या कोरोना पॉझिटिव्ह
भारत आणि श्रीलंका दरम्यान खेळवण्यात येणार दुसरा टी-20 सामना स्थगित करण्यात आला होता. टीम इंडियाचा ऑलराउंडर क्रुणाल पंड्याला कोरोनाची लागण झाल्याने हा सामना स्थगित करण्यात आला आहे. तसेच भारत आणि श्रीलंकेच्या संघानी आयसोलेट केलं होतं. बीसीसीआयनने ट्वीट करत याची माहिती दिली होती.
त्यानंतर दोन्ही संघाच्या खेळाडूंची आणि स्टाफची चाचणी करण्यात आली होती. स्थगित करण्यात आलेला सामना 28 जुलैला खेळवण्यात आला. भारताने या अगोदरचा पहिला सामना जिंकला होता. परंतु दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेनं भारतावर मात करत विजय मिळवला. बीसीसीआय आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं की, "क्रुणाल पंड्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे भारत आणि श्रीलंकेदरम्यान होणारा दुसरा टी20 सामना स्थगित करण्यात आला.क्रुणाल पंड्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर मेडिकल टीमने त्याच्या संपर्कात आलेल्या 8 जणांना आयसोलेट केले आहे. अद्याप त्यांचा अहवाल आलेला नाही."
महत्त्वाच्या इतर बातम्या :