VIDEO : बॉल नव्हे तोफगोळा, वोक्सचा आग ओकणारा चेंडू, यशस्वी जैस्वालच्या बॅटचे तुकडे, नेमकं काय घडलं?
Chris Woakes breaks Yashasvi Jaiswal bat : क्रिस वोक्सचा आग ओकणारा चेंडू, एका दणक्यात बॅटचे दोन तुकडे; यशस्वी जैस्वाल फक्त पाहातच राहिला

England vs India 4th Test Update : मँचेस्टर मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथा कसोटी सामना खेळला जात आहे आणि नवव्या षटकात एक धक्कादायक दृश्य पाहायला मिळाले. भारतीय संघाचा स्टार ओपनर यशस्वी जैस्वाल खेळत असताना, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज क्रिस वोक्स याने टाकलेला एक चेंडू थेट जैस्वालच्या बॅटवर लागला आणि काय तर बॅटचे तुकडे झाले.
यशस्वी जैस्वालच्या बॅटचे तुकडे, नेमकं काय घडलं?
चेंडू बॅटच्या हँडलवर लागला आणि तेथूनच बॅट अक्षरशः तुटली. यशस्वी काही क्षण स्तब्ध झाला. त्याने बॅटकडे बारकाईने पाहिलं आणि थोड्या वेळाने ड्रेसिंग रूमकडे इशारा केला. लगेच करुण नायर 3-4 बॅट घेऊन मैदानात धावत आला. मग जैस्वालने नवी बॅट घेतली आणि सामना पुन्हा सुरू झाला.
हे सगळं घडलं 9व्या षटकाच्या 5व्या चेंडूवर. विशेष म्हणजे, मॅच सुरू होण्याआधी मँचेस्टरमध्ये जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळे पिचवर ओलावा होता आणि इंग्लिश गोलंदाजांनी याचा पुरेपूर फायदा घेतला. वोक्स आणि आर्चरने चेंडू वेगात टाकण्याचा निर्णय घेतला. मात्र यशस्वीची बॅट जी चेंडूनं फोडली, त्याचा वेग फक्त 126 किमी/तास होता. क्रिस वोक्सने गुड लेंथवर चेंडू टाकला. यशस्वी डिफेन्सिव्ह शॉट खेळायच्या तयारीत होता, पण चेंडू थेट बॅटच्या वरच्या भागावर लागला आणि बॅट तुटली. या घटनेनंतर काही वेळ सामना थांबवावा लागला.
Bat be like “mujhe kyun toda?” 😭🏏#ENGvIND 👉 4th TEST, DAY 1 | LIVE NOW on JioHotstar 👉 https://t.co/0VxBWU8ocO pic.twitter.com/q80vIuwqIj
— Star Sports (@StarSportsIndia) July 23, 2025
या सामन्यात इंग्लंडच्या कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने दुखापतीमुळे तीन बदल करत साई सुदर्शन, शार्दुल ठाकूर आणि पदार्पण करणाऱ्या अंशुल कंबोजला संधी दिली आहे. करुण नायर, नीतीश रेड्डी आणि आकाशदीप यांना विश्रांती देण्यात आली आहे. इंग्लंडने देखील एक बदल करत लियान डॉसनला संघात घेतलं आहे. सध्या इंग्लंड 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे, त्यामुळे भारतासाठी हा सामना अतिशय निर्णायक ठरणार आहे.
भारतीय संघाची प्लेइंग -11 : यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अंशुल कंबोज.
इंग्लंड संघाची प्लेइंग -11 : जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), लियाम डॉसन, ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर.
हे ही वाचा -





















