Cheteshwar Pujara: चेतेश्वर पुजारा आक्रमक मोडमध्ये! काऊंटी क्रिकेटमध्ये झळकावलं पाचवं शतकं
Cheteshwar Pujara: खराब फॉर्ममुळं भारतीय कसोटी संघातून वगळलेल्या भारताचा स्टार फलंदाज चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) इंग्लंडच्या गोलंदाजांची शाळा घेत आहे.
Cheteshwar Pujara: खराब फॉर्ममुळं भारतीय कसोटी संघातून वगळलेल्या भारताचा स्टार फलंदाज चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) इंग्लंडच्या गोलंदाजांची शाळा घेत आहे. इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या काऊंटी क्रिकेटमध्ये चेतेश्वर पुजारानं पाचवं शतक झळकावलं आहे. भारताच्या बर्मिंगहॅम कसोटीपूर्वी पुजारानं ससेक्सकडून खेळताना चार शतक केली होती. त्यानंतर त्याची भारतीय संघात एन्ट्री झाली. इंग्लंडविरुद्ध बर्मिंगहॅम कसोटीत त्यानं अर्धशतक झळकावलं होतं. त्यानंतर तो पुन्हा ससेक्स क्रिकेट क्लबमध्ये दाखल झाला आणि काऊंटी क्रिकेटमधील पाचवं शतक ठोकलं.
मिडलसेक्सविरुद्ध पुजाराची नाबाद 115 धावांची खेळी
मिडलसेक्सविरुद्ध चेतेश्वर पुजाराला ससेक्सच्या संघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली. दरम्यान, मिडलसेक्सविरुद्ध चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेल्या चेतेश्वर पुजारानं दमदार शतक झळकावलं. पुजारानं पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 182 चेंडूत 10 चौकार आणि एका षटकारांच्या मदतीनं नाबाद 115 धावांची खेळी केली. पुजारानं 144 चेंडूत त्याचं शतक झळकावलं. या हंगामातील त्यांचं पाचवं शतक आहे. या हंगामात त्यानं आधीच दोन दुहेरी शतकसह चार शतक झळकावली आहेत. या काऊंटी क्रिकेट लीगमध्ये चेतेश्वर पुजारा सातत्यानं धावा काढत आहे.
ट्वीट-
पुजाराचं दमदार प्रदर्शन
पुजारानं इंग्लंडच्या काऊंटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत 881 धावा केल्या आहेत. ज्यात दोन दुहेरी शतकांसह पाच शतक ठोकली आहेत. काऊंटी क्रिकेटमध्ये या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पुजारा तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्यापुढं शान मसूद आणि बेन डुकेट आहेत. दोघांनी प्रत्येकी 1000-1000 हून अधिक धावा केल्या आहेत. परंतु, या हंगामात सर्वाधिक शतक ठोकणाऱ्या फलंदाजाच्या यादीत चेतेश्वर पुजारा अव्वल आहे.
हे देखील वाचा-