IND vs WI, Playing 11 : वेस्टइंडीजविरुद्ध एकदिवसीय सामन्यात दिग्गज खेळाडू विश्रांतीवर, कशी असू शकते अंतिम 11
India vs West Indies : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यांना 22 जुलैपासून सुरुवात होणार असून पहिलाच एकदिवसीय सामना पार पडणार आहे.
IND vs WI 1st ODI, Team India Playing 11 : इंग्लंडला 2-1 च्या फरकाने एकदिवसीय मालिकेत मात दिल्यानंतर आता भारतीय संघ वेस्टइंडीज संघाला (IND vs WI) मात देण्यासाठी सज्ज झाली आहे. भारत आणि वेस्ट इंडीज (IND vs WI ODI) यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. येत्या 22 जुलै 2022 पासून भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. तर एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारत दिग्गज खेळाडूंविना मैदानात उतरणार असून यावेळी शिखर धवनच्या नेतृत्त्वाखाली कसा संघ असेल या चर्चांना उधाण आलं आहे.
कोहली, रोहित, पंत, बुमराहसह हार्दिकही विश्रांतीवर
वेस्ट इंडीजविरुद्ध भारतीय संघाची घोषणा केल्यानंतर यावेळी शिखर धवन कर्णधार असून रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह हे दिग्गज संघात नाहीत. त्यामुळे नेमका संघ कसा असेल पाहूया..
धवन-गिल सलामीला, तर मिडल ऑर्डर कशी?
पहिल्या एकदिवसीय सामन्यात शिखर धवन आणि शुभमन गिल सलामीला येऊ शकतात. त्यानंतर श्रेयस अय्यर मग सूर्यकुमार यादव, पाच नंबरला दीपक हुडा आणि सहा नंबरवर संजू सॅमसन उतरु शकतो.
जाडेजाच्या नेतृत्त्वाखाली गोलंदाजी
सातव्यानंबरवर रवींद्र जाडेजा खेळणार असून जाडेजा गोलंदाजीचं नेतृत्त्वही करेल. यावेळी युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि प्रसिध कृष्णाही संघात गोलंदाजीसाठी असतील.
भारताची संभाव्य अंतिम 11
शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), दीपक हुडा, रवींद्र जाडेजा, शार्दूल ठाकूर, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा.
हे देखील वाचा-
- England Cricket : 'जेम्स अँडरसनसोबत एकाच संघात खेळण्यासाठी कमालीचा उत्साही' : वॉशिंग्टन सुंदर
- Sreesanth about Virat : 'विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली मी खेळलो असतो तर संघाने विश्वचषक जिकला असता,' माजी गोलंदाज श्रीशांतचा दावा
- Commonwealth Games 2022: विश्वचषकात महिला हॉकी संघाचं खराब प्रदर्शन, कॉमनवेल्थ गेम्समध्ये दमदार कामगिरीची अपेक्षा