(Source: ECI/ABP News/ABP Majha)
KL Rahul Athiya Shetty: लग्नानंतर पहिल्यांदाच डिनर डेटवर केएल-अथिया, फोटो व्हायरल
KL Rahul and Athiya Shetty : क्रिकेटर केएल राहुल बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीसोबत 23 जानेवारी रोजी लग्नबंधनात अडकला.
KL Rahul Athiya Photos : क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul) आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) यांचं लग्न 23 जानेवारी रोजी पार पडलं. ज्यानंतर सोमवारी हे जोडपं पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या एकत्र बाहेर फिरताना दिसलं. केएल राहुल आणि अथिया शेट्टी दोघेही डिनर डेटसाठी बाहेर गेले होते. यादरम्यान दोघांनी एकमेकांचा हात पकडला होता, त्यांनी तिथे असणाऱ्या फोटोग्राफर्ससाठी काही पोजही दिल्या.
फोटो सोशल मीडियावर व्हायरल
आधी लग्नाचे मग हळदी आणि संगीत कार्यक्रमाचे फोटो व्हायरल झाल्यावर आज केएल राहुल आणि अथिया शेट्टीचे डिनर डेचे फोटोही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. चाहते यावर सतत कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
दरम्यान, भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 9 फेब्रुवारी रोजी नागपुरात होणार आहे. या महत्त्वाच्या मालिकेत केएल राहुल भारतीय संघाचा भाग असेल, असे मानले जात आहे की, केएल राहुल आणि अथिया शेट्टी मुंबईहून नागपूरला एकत्र येतील.
केएल राहुल आणि अथियाचं लग्न अथियाचे वडील अभिनेता सुनील शेट्टी याच्या (Suniel Shetty) खंडाळ्यातील फार्महाऊसवर फक्त 100 पाहुण्यांच्या उपस्थितीत झालं. विवाहसोहळ्याचे फोटो त्याच दिवशी समोर आल्यानंतर काही दिवसांनी हळदी समारंभाचे फोटोही समोर आले होते. त्यानंतर संगीत सोहळ्यातील फोटोही समोर आले. ज्यात दोघेही डान्स करताना दिसत होत. या फोटोंना अवघ्या काही वेळातच अनेक नेटकऱ्यांनी लाईक केलं असून कमेंट्सचा अक्षरश: वर्षाव होताना दिसला. विशेष म्हणजे, केएल राहुलचे सासरेबुवा अर्थात अथियाचे वडील सुनील शेट्टी याने देखील लव्ह इमोजी पोस्ट केला होता.
केएल राहुल ऑस्ट्रेलिया मालिकेतून परतणार
23 जानेवारी रोजी मुंबईजवळील खंडाळा भागात केएल राहुल आणि अथिया शेट्टीचे लग्न मोठ्या थाटात पार पडले. दरम्यान, लग्नामुळेच केएल राहुल सध्या भारतीय संघाचा भाग नाही. भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. याआधी टीम इंडियाने 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत न्यूझीलंडचा 3-0 ने पराभव केला होता. त्या मालिकेतही केएल राहुल संघाचा भाग नव्हता. आता भारतीय संघाची नजर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेवर आहे. नागपूर कसोटीपूर्वी टीम इंडियासाठी एका शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी राहुल नागपुरला पोहोचेल अशी शक्यता आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :