Athiya Shetty KL Rahul Wedding : आज केएल राहुल चढणार बोहल्यावर; अथिया शेट्टीसोबत अडकणार लग्नबंधनात
Athiya Shetty - KL Rahul : चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर आज अथिया शेट्टी आणि केएल राहुल लग्नबंधनात अडकणार आहेत.
![Athiya Shetty KL Rahul Wedding : आज केएल राहुल चढणार बोहल्यावर; अथिया शेट्टीसोबत अडकणार लग्नबंधनात Athiya shetty KL Rahul Wedding After dating each other for four years Athiya Shetty and KL Rahul are finally going to tie the knot today Athiya Shetty KL Rahul Wedding : आज केएल राहुल चढणार बोहल्यावर; अथिया शेट्टीसोबत अडकणार लग्नबंधनात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/23/2ece5aa5a1235e80d1e08f89c579de7f1674459222314254_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Athiya Shetty, KL Rahul wedding LIVE : क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul) आणि सुनील शेट्टीची (Suniel Shetty) लाडकी लेक, अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आज लग्नबंधनात अडकणार आहेत. चार वर्षे अथियाला डेट केल्यानंतर अखेर आज केएल राहुल बोहल्यावर चढणार आहे. सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील बंगल्यात त्यांचा शाही विवाहसोहळा संपन्न होणार आहे.
Athiya Shetty, KL Rahul wedding : अथिया-राहुल किती वाजता लग्नबंधनात अडकणार?
मीडिया रिपोर्टनुसार, अथिया आणि केएल राहुल संध्याकाळी चार वाजता लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी 6.30 वाजता ते कुटुंबियांसोबत मीडियाला भेटणार आहेत. तसेच अनोख्या पद्धतीने चाहत्यांचे आभार मानणार आहेत.
Athiya Shetty, KL Rahul wedding : लग्नानंतर होणार ग्रॅंड रिसेप्शन!
अथिया आणि केएल राहुलच्या ग्रॅंड रिसेप्शनकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. बॉलिवूड तसेच क्रिकेट विश्वातील अनेक सेलिब्रिटी, राजकारणी नेतेमंडळी आणि उद्योगपती अथिया-केएल राहुलच्या ग्रॅंड रिसेप्शनला उपस्थित राहणार आहेत. या रिपेप्शनला 3000 पाहुणे उपस्थित राहु शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे.
Athiya Shetty, KL Rahul wedding : अथिया-केएल राहुलची हटके लव्हस्टोरी... (Athiya shetty-KL Rahul Love Story)
अथिया-राहुल गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. 2019 साली एका मित्राच्या पार्टीत केएल राहुलने अथियाला पाहिलं होतं. त्या कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून त्यांची मैत्री झाली. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर अखेर आज ते दोघे नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी सज्ज आहेत.
View this post on Instagram
Athiya Shetty, KL Rahul wedding : 'त्या' फोटोमुळे नातं झालं जगजाहीर!
अथिया आणि केएल राहुलचं नातं 2021 साली जगजाहीर झालं. राहुलच्या वाढदिवशी अथियाने एक खास पोस्ट लिहित क्रिकेटरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर ते दोघे अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. राहुलची मॅच पाहण्यासाठी अथिया बऱ्याचदा स्टेडियमध्ये गेली आहे.
Athiya Shetty, KL Rahul wedding : दाक्षिणात्य पद्धतीने लग्नबंधनात अडकणार!
अथिया आणि केएल राहुल दाक्षिणात्य पद्धतीने लग्नबंधनात अडकणार आहेत. तसेच पाहुण्यांना जेवणात देखील दाक्षिणात्य पदार्थांची मेजवानी असणार आहे. केळीच्या पानावर जेवण वाढण्यात येणार आहे.
थोड्याच वेळात हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. या शाही विवाहसोहळ्याकडे आता चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
संबंधित बातम्या
KL Rahul Athiya Shetty Wedding : KL राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नाला उरले अवघे काही तास; लग्नाशी संबंधित सर्व अपडेट वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)