BCCI Selection Committee: माजी क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद बीसीसीआयच्या निवड समितीचे नवे अध्यक्ष? लवकरच घोषणा
BCCI Selection Committee: भारतीय क्रिकेट संघाचे माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद (Venkatesh Prasad) बीसीसीआयच्या (BCCI) निवड समितीचे अध्यक्ष होऊ शकतात.
BCCI Selection Committee: भारतीय क्रिकेट संघाचे माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद (Venkatesh Prasad) बीसीसीआयच्या (BCCI) निवड समितीचे अध्यक्ष होऊ शकतात. भारतीय नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय लवकरच याबाबत घोषणा करू शकते. इनसाइडस्पोर्ट्सनं दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआय निवड समितीच्या निवडीला अंतिम रूप देण्याचा तयारीत आहे. या महिन्याच्या अखेरीस बीसीसीआय व्यंकटेश प्रसाद यांच्या नावाची घोषणा करू शकते, अशी माहिती समोर येत आहे.
बीसीसीआयच्या एका सूत्रानं इनसाइडस्पोर्ट्सला दिलेल्या माहितीनुसार, "बीसीसीआय नव्या निवड समीतीला अंतिम रुप देण्याच्या तयारीत आहे. या डिसेंबर महिन्याच्या अखेरीस नव्या निवड समितीची घोषणा केली जाईल. व्यंकटेश प्रसाद हे सर्वात अनुभवी क्रिकेटपटूंपैकी एक आहेत, ज्यांनी निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी आपलं नाव नोंदवलं आहे. यावर कोणतीही औपचारिक चर्चा झाली नसली तरी नवीन अध्यक्ष म्हणून त्यांना सर्वांचा विश्वासदर्शक ठराव मिळण्याची शक्यता आहे".निवड समितीच्या नवीन अध्यक्षाची घोषणा करण्यापूर्वी सीएसी पुढील आठवड्यात सर्व निवडक क्रिकेटपटूंची मुलाखत घेईल. माजी निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मा यांनीही या पदासाठी पुन्हा अर्ज केलाय. पण बीसीसीआय आणि सीएसी यंदा चेतनला दुसरी संधी देण्याबाबत निश्चित नाही.
व्यकटेश प्रसादची कारकीर्द
भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यांची कारकीर्द खूप चांगली आहे. त्यानं आपल्या कारकिर्दीत भारतासाठी एकूण 161 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्यानं 196 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्यानं 33 कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्वही केले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 96 विकेट्सची नोंद आहे. व्यंकटेश प्रसाद हा भारतीय संघाचा अत्यंत प्रभावशाली गोलंदाज मानला जातो. सध्या तो क्रिकेट कॉमेंट्री करताना दिसत आहे. वेंकटेश प्रसाद यांनी देखील भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी एकदा अर्ज केला होता. पण त्यांची निवड झाली नाही.
निवड समीतीच्या अध्यक्षपदासाठी अटी
1) अर्जदारानं सात कसोटी सामन्यात देशात प्रतिनिधित्व केलेलं असावं किंवा
2) 30 प्रथम श्रेणी क्रिकेट सामने किंवा
3) 10 एकदिवसीय आणि 20 प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणं गरजेचं.
नवीन निवडकर्त्यांवर कोणती मुख्य जबाबदारी असणार?
- प्रत्येक प्रकारच्या संघासाठी कर्णधाराची नियुक्ती करणे
- मजबूत बेंच स्ट्रेंथ तयार करा
- देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय खेळ पाहण्यासाठी प्रवास करा
- संघ निवडीवर मीडियाला संबोधित करा
- योग्य आणि पारदर्शक पद्धतीने शक्य तितका सर्वोत्तम संघ निवडा
हे देखील वाचा-