Rohit Sharma Injury Updates: रोहित शर्मा बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकणार? बीसीसीआयकडून महत्त्वाची अपडेट
Rohit Sharma Injury Updates: भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) दुखापत झाली होती.
Rohit Sharma Injury Updates: भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) दुखापत झाली होती. ज्यानंतर रोहित शर्मा बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. यातच भारतीय नियामक मंडळ म्हणजेच बीसीसआयनं (BCCI) रोहित शर्मा, दीपक चाहर (Deepak Chahar) आणि कुलदीप सेनच्या (Kuldeep Sen) जखमी त्रिकुटाच्या दुखापतीबाबत महत्वाची अपडेट दिली आहे.
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातील दुसऱ्या षटकात फिल्डिंग करताना रोहित शर्माच्या अंगठ्याला दुखापत झाली. रोहित शर्माची दुखापत गंभीर असून तो चट्टोग्राममधील अंतिम सामन्याला मुकणार आहे.मुंबईत विशेष सल्लामसलत केल्यानंतर कसोटी मालिकेसाठी त्याची उपलब्धता निश्चित केली जाईल.
ट्वीट-
🚨 JUST IN: The BCCI have released an update on the injury status of skipper Rohit Sharma.
— ICC (@ICC) December 9, 2022
Details 👇 https://t.co/7yZ0euvDgA
स्लिपमध्ये फिल्डिंग करताना रोहित शर्माला दुखापत
स्लिपमध्ये फिल्डिंग करताना मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर झेल पकडण्याच्या प्रयत्नात रोहितच्या अंगठ्याला दुखापत झाली. ज्यानंतर त्याला लगेच मैदाना सोडावं लागलं. त्याच्या जागी रजत पाटीदारला मैदानात फिल्डिंगसाठी बोलवण्यात आलं. बांगलादेशनं दिलेल्या 272 धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा नवव्या क्रमांकावर फलंदाजी आला. त्यानं 28 चेंडूत 51 धावांची कडवी झुंज दिली. पण भारताला विजय मिळवून देण्यास तो अपयशी ठरला. हा सामना पाच धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह भारतानं तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी पिछाडी घेतलीय. चट्टोग्राम येथे 14 डिसेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. यापूर्वी रोहित शर्मा दुखापतीतून सावरेल का? हा सर्वांसमोर पडलेला मोठा प्रश्न आहे.
अखरेच्या एकदिवसीय सामन्यात कुलदीप यादवचा संघात समावेश
कुलदीप सेननं पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर पाठीच्या दुखापतीची समस्या जाणवत असल्याची आल्याची तक्रार केली होती. त्यानंतर बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकानं त्याची तपासणी केली. तसेच त्याला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विश्रांतीचा सल्ला देण्यात आला. कुलदीपला स्ट्रेस इंजरीचं निदान झाले असून तो मालिकेतून बाहेर पडला आहे. याचबरोबर दीपक चहरला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान डाव्या हाताच्या दुखापतीचा त्रास झाला. ज्यामुळं त्यालाही एकदिवसीय मालिकेतूनही बाहेर पडला. कुलदीप आणि दीपक दोघेही आता त्यांच्या दुखापतींच्या पुढील व्यवस्थापनासाठी एनसीएकडे अहवाल देतील. याच पार्श्वभूमीवर अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीनं कुलदीप यादवचा तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघात समावेश केलाय
हे देखील वाचा-