एक्स्प्लोर

BCCI Releases 10 New Guidelines: ...तर आयपीएल खेळण्यावर बंदी येणार, पगारही कापणार; बीसीसीआयने खेळाडूंसाठी लागू केला नवा नियम!

BCCI Releases 10 New Guidelines For Indian Players: सर्व खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटमध्ये भाग घेणे अनिवार्य असेल, असं बीसीसीआयकडून जारी करण्यात आले आहे.

BCCI Releases 10 New Guidelines For Indian Players: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) 10 नवीन नियम जारी (BCCI Releases 10 New Guidelines For Indian Players) केले आहेत, जे सर्व भारतीय खेळाडूंना पाळणे बंधनकारक असेल. बीसीसीआयच्या या दहा नवीन नियामांचे उल्लंघन केल्यास संबंधित खेळाडूला कठोर शिक्षा देखील दिली जाऊ शकते. नियमांचे उल्लंघन केल्यास पगार कपात ते आयपीएल बंदी अशा गोष्टींचा समावेश असेल.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारताचा 1-3 असा पराभव झाल्यानंतर बीसीसीआयने आक्रमक पवित्रा आहे. याचपार्श्वभूमीवर बीसीसीआयकडून नवीन दहा नियम लागू करण्यात आले आहे. संघात शिस्त, एकता आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी हे केले जात असल्याचे सांगितले जात आहे. पण असा एक नियम आहे, ज्यामुळे खेळाडूला पगार कपात आणि आयपीएलमधून बंदी अशा शिक्षेला सामोरे जावे लागू शकते.

बीसीसीआयने स्पष्ट केले आहे की, आता सर्व खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटमध्ये भाग घेणे अनिवार्य असेल. याशिवाय अनेक कडक नियमही जारी करण्यात आले आहेत. जर कोणत्याही खेळाडूने नियमांचे उल्लंघन केले तर त्याला शिक्षा भोगावी लागेल, असा इशाराही बोर्डाने दिला आहे. एका नवीन नियमात म्हटले आहे की, जर एखादी गंभीर परिस्थिती किंवा समस्या उद्भवली तर, एखादा विशिष्ट खेळाडू मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्त्याची परवानगी घेतल्यानंतरच या नियमांबाहेर वागू शकतो. जर असे केले नाही तर शिस्तभंगाची कारवाई केली जाऊ शकते.

...तर आयपीएलमध्ये खेळण्यास बंदी 

बीसीसीआयचे म्हणणे आहे की, सर्व खेळाडूंना बोर्डाने आयोजित केलेल्या कोणत्याही स्पर्धेत खेळणे बंधनकारक असेल, ज्यामध्ये आयपीएलचाही समावेश असेल. जर एखादा खेळाडू या नियमाचे उल्लंघन करताना आढळला तर त्याला बोर्डाकडून त्याच्या पगारात कपात, त्याच्या सामन्याच्या मानधनात कपात किंवा आयपीएल बंदी देखील लागू शकते.

रणजी ट्रॉफी सामन्यांची पुढील फेरी 23 जानेवारीपासून-

रणजी ट्रॉफीचा पुढील हंगाम 23 जानेवारीपासून सुरू होत असताना बीसीसीआयने हे नियम लागू झाले आहेत. ऋषभ पंत, शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांच्यासह अनेक प्रसिद्ध खेळाडू आपापल्या देशांतर्गत संघांकडून खेळतील हे जवळजवळ निश्चित दिसतंय. परंतु रोहित शर्मा आणि विराट कोहली रणजी क्रिकेट स्पर्धेत भाग घेणार की नाही अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 

संबंधित बातमी:

टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Crime : सख्ख्या भावांनी क्रुरपणे बापलेकांना संपवलं! जमिनीचा तुकडा ठरला जीवघेणा, नेमकं काय घडलं?
सख्ख्या भावांनी क्रुरपणे बापलेकांना संपवलं! जमिनीचा तुकडा ठरला जीवघेणा, नेमकं काय घडलं?
Infosys : गुड न्यूज, इन्फोसिस येत्या आर्थिक वर्षात 20 हजार फ्रेशर्सला नोकरी देणार, तिसऱ्या तिमाहीतील दमदार कामगिरीनंतर अपडेट समोर
तरुणांसाठी गुड न्यूज, इन्फोसिस येत्या वर्षभरात 20 हजार फ्रेशर्सना नोकरी देणार; तिसऱ्या तिमाहीत 6806 कोटींचा नफा
Dhananjay Munde : काल वाल्मिक कराडच्या जाग्यावर बसून जनता दरबार, उद्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला धनंजय मुंडे येणार की नाही? छगन भुजबळांची सुद्धा अपडेट समोर
काल वाल्मिक कराडच्या जाग्यावर बसून जनता दरबार, उद्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला धनंजय मुंडे येणार की नाही? छगन भुजबळांची सुद्धा अपडेट समोर
Israeli attacks on Gaza : युद्धविरामची घोषणा करूनही इस्त्रायलचा गाझापट्टीत नरसंहार सुरुच; 21 लेकरं अन् 25 महिलांसह 87 पॅलेस्टिनींचा मृत्यू
युद्धविरामची घोषणा करूनही इस्त्रायलचा गाझापट्टीत नरसंहार सुरुच; 21 लेकरं अन् 25 महिलांसह 87 पॅलेस्टिनींचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bandra Robbery CCTV : सैफसारखा प्रकार या आधीही वांद्र्यात घडला? स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरणPravin Tarde Ahilyanagar : लोक कला जिवंत ठेवण्यासाठी मोठं पाऊल, प्रवीण तरडेंनी दिली माहितीKareena Kapoor Khan Appeal :आम्हाला आमची स्पेस द्या, हल्ल्यानंतर करिना कपूरची पहिली प्रतिक्रिया काय?ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 17 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Crime : सख्ख्या भावांनी क्रुरपणे बापलेकांना संपवलं! जमिनीचा तुकडा ठरला जीवघेणा, नेमकं काय घडलं?
सख्ख्या भावांनी क्रुरपणे बापलेकांना संपवलं! जमिनीचा तुकडा ठरला जीवघेणा, नेमकं काय घडलं?
Infosys : गुड न्यूज, इन्फोसिस येत्या आर्थिक वर्षात 20 हजार फ्रेशर्सला नोकरी देणार, तिसऱ्या तिमाहीतील दमदार कामगिरीनंतर अपडेट समोर
तरुणांसाठी गुड न्यूज, इन्फोसिस येत्या वर्षभरात 20 हजार फ्रेशर्सना नोकरी देणार; तिसऱ्या तिमाहीत 6806 कोटींचा नफा
Dhananjay Munde : काल वाल्मिक कराडच्या जाग्यावर बसून जनता दरबार, उद्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला धनंजय मुंडे येणार की नाही? छगन भुजबळांची सुद्धा अपडेट समोर
काल वाल्मिक कराडच्या जाग्यावर बसून जनता दरबार, उद्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला धनंजय मुंडे येणार की नाही? छगन भुजबळांची सुद्धा अपडेट समोर
Israeli attacks on Gaza : युद्धविरामची घोषणा करूनही इस्त्रायलचा गाझापट्टीत नरसंहार सुरुच; 21 लेकरं अन् 25 महिलांसह 87 पॅलेस्टिनींचा मृत्यू
युद्धविरामची घोषणा करूनही इस्त्रायलचा गाझापट्टीत नरसंहार सुरुच; 21 लेकरं अन् 25 महिलांसह 87 पॅलेस्टिनींचा मृत्यू
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट, आता सीआयडीचेही तपास अधिकारी बदलले, नेमकं कारण काय?
संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट, आता सीआयडीचेही तपास अधिकारी बदलले, नेमकं कारण काय?
Congress on Worship Act : प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
IPO Update : सलग सहा आयपीओंमधून दमदार कमाई, स्टॅलिऑन इंडियाच्या IPO साठी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, GMP कितीवर?
आयपीओमधून कमाईचा राजमार्ग, 6 IPO मधून चांगला परतावा, स्टॅलिऑन इंडियाचा रिटेल गुंतवणूकदारांचा कोटा पूर्ण
Nagpur Crime News : नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
Embed widget