Ind Squad vs Nz ODI Series : शमीपेक्षा मेहनती खेळाडू दाखवा, बंगालच्या मुख्य प्रशिक्षकांचा संताप अनावर; संघाची निवड झाल्यानंतर नको नको ते बोलले, उडाली खळबळ
India ODI Squad for New Zealand 2026 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार असून, या मालिकेसाठी निवड समितीने 3 जानेवारी रोजी टीम इंडियाची घोषणा केली.

Mohammed Shami Not in Ind Squad vs Nz ODI Series : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार असून, या मालिकेसाठी निवड समितीने 3 जानेवारी रोजी टीम इंडियाची घोषणा केली. या संघात श्रेयस अय्यर आणि शुभमन गिलची पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे. दुखापतीमुळे हे दोघेही दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळू शकले नव्हते.
या संघघोषणेकडे सर्वांचे लक्ष मोहम्मद शमीवर होते. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी शमीला संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र निवड समितीने त्याकडे दुर्लक्ष केल्याने क्रिकेटविश्वात चर्चांना उधाण आले आहे. आता या मुद्द्यावर माजी भारतीय क्रिकेटपटू आणि बंगालचे मुख्य प्रशिक्षक लक्ष्मी रतन शुक्ला यांनी निवड समितीवर जोरदार टीका केली आहे.
शमीसोबत अन्याय झाला – लक्ष्मी रतन शुक्ला
बंगालचे मुख्य प्रशिक्षक लक्ष्मी रतन शुक्ला यांनी शमीच्या डावलण्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, शमीसोबत सरळसरळ अन्याय झाला आहे. एका मीडिया चॅनलशी बोलताना शुक्ला म्हणाले, “निवड समितीने मोहम्मद शमीसोबत अन्याय केला आहे. अलीकडच्या काळात कोणत्याही आंतरराष्ट्रीय खेळाडूने शमीइतकी मेहनत देशांतर्गत क्रिकेटमध्येघेतलेली नाही. इतकी मेहनत करूनही शमीला दुर्लक्षित करणे ही लाजिरवाणी बाब आहे.”
🚨 News 🚨
— BCCI (@BCCI) January 3, 2026
India’s squad for @IDFCFIRSTBank ODI series against New Zealand announced.
Details ▶️ https://t.co/Qpn22XBAPq#TeamIndia | #INDvNZ pic.twitter.com/8Qp2WXPS5P
बराच काळ संघाबाहेर
मोहम्मद शमीने भारतासाठी शेवटचा वनडे सामना चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत खेळला होता. त्यानंतर त्याला सातत्याने भारतीय संघातून डावलण्यात आले. इंग्लंडविरुद्धची पाच कसोटींची मालिका, त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील तीन वनडे आणि पाच टी-20 सामने, तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी, वनडे आणि टी-20 मालिका या सर्वांमधून शमीला बाहेर ठेवण्यात आले. आता न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या वनडे आणि टी-20 मालिकेसाठीही त्याची निवड न झाल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी
शमीने बंगालकडून विजय हजारे ट्रॉफी 2025-26 मध्ये आतापर्यंत जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याने पाच सामन्यांत 11 विकेट्स घेतल्या आहेत. असमविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात त्याने तीन फलंदाजांना बाद केले होते. त्याआधी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतील शेवटच्या पाच सामन्यांत त्याने 13 विकेट्स घेतल्या होत्या. एवढी प्रभावी कामगिरी असूनही एका अनुभवी आणि दर्जेदार गोलंदाजाला सातत्याने डावलले जात असल्याने निवड प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
न्यूझीलंड विरुद्ध भारताचा एकदिवसीय संघ (India's ODI squad against New Zealand) - शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव, ऋषभ पंत, नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल.
हे ही वाचा -





















