Pak Squad VS Ban T20 Series : पाकिस्तान क्रिकेट संघात मोठी उलथापालथ; बाबर आझम, आफ्रिदी, रिझवानला संघातून डच्चू, कोण बनला कर्णधार?
Pakistan VS Bangladesh News : बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी पाकिस्तान संघ जाहीर, बाबर-रिझवान बाहेर

Pakistan squad for Bangladesh T20Is : पुढील मालिकेसाठी पाकिस्तान क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान व्यतिरिक्त शाहीन शाह आफ्रिदीला या संघातून डच्चू मिळाला आहे. पाकिस्तानी संघ या महिन्यात बांगलादेशविरुद्ध टी-20 मालिका खेळण्याची तयारी करत आहे. यासाठी सलमान अली आगा यांना पुन्हा एकदा कर्णधार बनवण्यात आले आहे. एकीकडे तीन मोठ्या खेळाडूंना वगळण्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात असताना, पीसीबी निवड समिती काय विचार करते हे देखील पाहणे बाकी आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. पूर्वी ही मालिका पाच सामन्यांची असणार होती, पण आता ती फक्त तीन सामन्यांची करण्यात आली आहे. या मालिकेसाठी पाकिस्तानच्या 16 खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे.
🚨Pakistan has announced the squad for the Home T20IS series against Bangladesh.
— Nadeem (@cricupdatesonX) May 21, 2025
Babar Azam ❌
Mohammad Rizwan ❌
Shaheen Shah Afridi ❌
Hassan Ali ✅
Sahibzada Farhan ✅
Shadab Khan ✅
How do you rate this squad?#PakvsBan #PakistanCricket pic.twitter.com/D0qGY0Um2K
पण, त्यात बाबर, शाहीन आणि रिझवान यांची नावे नाहीत. मालिकेतील सर्व सामने लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळवले जातील. एकेकाळी मालिका अनिश्चित होती, परंतु पीसीबी आणि बीसीबी यांच्यातील बैठकीनंतर तीन सामन्यांच्या मालिकेला हिरवा कंदील देण्यात आला.
पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील ही मालिका आधी 25 मे पासून सुरू होणार होती, परंतु आता ती पुढे ढकलण्यात आली आहे, नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल. पीएसएल काही दिवसांसाठी स्थगित करण्यात आले होते, त्यामुळे ते पुन्हा वेळापत्रकात बदल करावे लागले. या मालिकेसाठी सलमान अली आगा यांच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, तर शादाब खान उपकर्णधारपदाची भूमिका साकारताना दिसणार आहेत.
बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी पाकिस्तान संघ
सलमान अली आगा (कर्णधार), शादाब खान, अबरार अहमद, फहीम अशरफ, फखर झमान, हरिस रौफ, हसन अली, हसन नवाज, हुसेन तलत, खुशदिल शाह, मोहम्मद हरिस, मोहम्मद वसीम, इरफान खान, नसीम शाह, साहिबजादा फरहान, सॅम अयुब
हे ही वाचा -





















