Babar Azam : आधी कर्णधारपद गेले, आता संघातून होणार हकालपट्टी? इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतून बाबर आझम बाहेर?
बाबर आझमला मुलतानमध्ये खेळल्या जाणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमधून वगळले जाऊ शकते. आधी बाबरने कर्णधारपद गमावले आणि आता त्याला संघातून काढून टाकले जाऊ शकते...
Babar Azam PAK vs ENG 2nd Test : बाबर आझम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सतत खराब फॉर्मचा सामना करत आहे. अलीकडेच बाबरला खराब फॉर्ममुळे कर्णधारपद गमवावे लागले होते. तो पाकिस्तानचा पांढऱ्या चेंडूचा कर्णधार होता, पण खराब फॉर्ममुळे त्याने कर्णधारपदाचा राजीनामा दिला. आता बाबर आझम पाकिस्तानच्या संघात दिसला नाही तर आश्चर्य वाटणार नाही. कारण, ते होणार आहे.
पाकिस्तानच्या नव्या निवड समितीने बाबर आझमला दुसऱ्या कसोटी सामन्यातून वगळण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना 15 ऑक्टोबरपासून मुलतान येथे सुरू होत आहे. इंग्लंडविरुद्ध मुलतानमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत बाबरच्या बॅटने केवळ 30 आणि 05 धावा केल्या होत्या.
ESPNcricinfo वर प्रसिद्ध झालेल्या वृत्तात, बाबरला इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यातून वगळले जाऊ शकते, असे म्हटले आहे. नव्याने स्थापन झालेल्या निवड समितीने बाबरला वगळण्याचा सल्ला दिल्याचे अहवालात सांगण्यात आले. मालिकेतील पहिली कसोटी गमावल्यानंतर काही तासांनी लाहोरमध्ये निवड समितीची बैठक झाली. या बैठकीला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वीही उपस्थित होते.
07 ते 11 ऑक्टोबर दरम्यान मुलतानमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटीतील पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदने बाबरची पाठराखण करत तो पाकिस्तानचा सर्वोत्तम फलंदाज असल्याचे म्हटले होते. प्रशिक्षक जेसन गिलेस्पीनेही याचे समर्थन केले. या बैठकीत संघाचा कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक सहभागी नसल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
15 ऑक्टोबरपासून मुल्तानमध्ये खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बाबरचा समावेश नसेल, तर तो-20 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या कायदे-ए-आझम ट्रॉफीसाठी स्वत:ला उपलब्ध करून देईल की नाही, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. बाबरने 2019 पासून एकही प्रथम श्रेणी सामना खेळलेला नाही.
बाबरची आत्तापर्यंत कसोटी कारकीर्द
बाबर आझमने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 55 कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 100 डावांमध्ये फलंदाजी करताना त्याने 43.92 च्या सरासरीने 3997 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 9 शतके आणि 26 अर्धशतके केली आहेत.
हे ही वाचा -
IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या कळपातून मोठी अपडेट; भारताला चॅम्पियन बनवणाऱ्या कोचची ताफ्यात एन्ट्री