Duleep Trophy 2025 : दुलीप ट्रॉफीमध्ये LSGच्या स्टार फलंदाजाने घातला धुमाकूळ, द्विशतक ठोकले, संघाची सेमीफायनलमध्ये धडक
Ayush Badoni Double Century Duleep Trophy 2025 : दिलीप ट्रॉफी 2025 मध्ये नॉर्थ झोनचा आणि लखनऊ सुपर जायंट्सचा खेळाडू आयुष बडोनीने कमाल केली.

Duleep Trophy 2025 : दिलीप ट्रॉफी 2025 मध्ये नॉर्थ झोनचा आणि लखनऊ सुपर जायंट्सचा खेळाडू आयुष बडोनीने (Ayush Badoni Double Century Duleep Trophy 2025) कमाल केली. त्याने तुफानी द्विशतक ठोकत आपल्या संघाला उपांत्य फेरीत पोहोचवले. ईस्ट झोनविरुद्धच्या पहिल्या क्वार्टर फायनल सामन्यात पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर नॉर्थ झोनने उपांत्य फेरीत मजल मारली. या सामन्यात दुसऱ्या डावात आयुषने केवळ 223 चेंडूत 13 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 204 धावा झळकावल्या. त्याच्यासोबतच कर्णधार अंकित कुमार आणि यश ढुल यांनीही शतकी खेळी करून चमक दाखवली.
आयुषची धमाकेदार खेळी
ईस्ट झोनविरुद्धच्या सामन्यात आयुष बडोनीने आपल्या फर्स्ट क्लास करिअरमधील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा डाव खेळला. याआधी त्याने गेल्या वर्षी रणजी ट्रॉफीत दिल्लीकडून खेळताना झारखंडविरुद्ध नाबाद 205 धावा ठोकल्या होत्या. या सामन्यात पहिल्या डावात आयुषने 60 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने 63 धावा केल्या, पण दुसऱ्या डावात त्याने तुफानी द्विशतक ठोकून पहिल्या डावाची कमतरता भरून काढली. हा त्याच्या फर्स्ट क्लास कारकिर्दीतील चौथे शतक ठरले. याआधी 14 सामन्यांच्या 21 डावांत त्याने 3 शतकं आणि 3 अर्धशतकं ठोकत एकूण 1063 धावा जमवल्या होत्या.
A long couple of days for East Zone as Ankit Kumar and Ayush Badoni collected monster hundreds to seal a semi-final qualification for North Zone, who declared with a lead of 833
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) August 31, 2025
Scorecard: https://t.co/TYifJrC7A8 | #DuleepTrophy pic.twitter.com/yKRD0BB7rk
आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळणाऱ्या आयुषने ईस्ट झोनविरुद्ध अप्रतिम फटकेबाजी करून एकाच गोलंदाजाला जबरदस्त चोप दिला. पहिल्या क्वार्टर फायनलमध्ये नॉर्थ झोनच्या फलंदाजांनी एकूणच जबरदस्त कामगिरी केली.
नॉर्थ झोनची उपांत्य फेरीत धडक
ईस्ट झोनविरुद्ध नॉर्थ झोनने पहिल्या डावात 405 धावा उभारल्या. त्याच्या प्रत्युत्तरात रियान परागच्या नेतृत्वाखालील ईस्ट झोनची पहिली खेळी फक्त 230 धावांवर गडगडली. त्यामुळे नॉर्थ झोनला 175 धावांची आघाडी मिळाली. यानंतर दुसऱ्या डावात आयुष बडोनीच्या अफलातून द्विशतकासोबतच कर्णधार अंकित कुमारच्या 198 धावा आणि यश ढुलच्या 133 धावा यांच्या जोरावर नॉर्थ झोनने 4 गडी गमावून तब्बल 658 धावा केल्या. शेवटी सामना अनिर्णित घोषित झाला आणि पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर नॉर्थ झोनने उपांत्य फेरीत मजल मारली.
हे ही वाचा -





















