Axar Patel News : BCCI नंतर आता दिल्ली कॅपिटल्सकडूनही अक्षर पटेलला मोठा धक्का, पुढील IPL संदर्भात मोठा निर्णय
आशिया कप 2025 चं वातावरण सध्या तापलं आहे. 9 सप्टेंबरपासून यूएईमध्ये सुरू होणाऱ्या या स्पर्धेत एकूण 8 संघ उतरतील.

Axar Patel To Be Removed From DC Captaincy IPL 2026 : आशिया कप 2025 चं वातावरण सध्या तापलं आहे. 9 सप्टेंबरपासून यूएईमध्ये सुरू होणाऱ्या या स्पर्धेत एकूण 8 संघ उतरतील. यासाठी टीम इंडियाचा संघ जाहीर झाला आहे. मात्र, या संघनिवडीदरम्यान निवड समितीने मोठा निर्णय घेतला आहे. अष्टपैलू अक्षर पटेलऐवजी शुभमन गिलकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
दरम्यान, अक्षर पटेलविषयी अजून एक मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएल 2026 हंगामात दिल्ली कॅपिटल्स त्याला कर्णधारपदाच्या जबाबदारीवरून काढू शकते, अशी माहिती मिळत आहे. अक्षर पुढील हंगामात खेळाडू म्हणून संघात असतील, पण कर्णधारपद त्याच्याकडे नसेल. रिपोर्टनुसार, पुढील मोसमात दिल्ली कॅपिटल्सला नवा कर्णधार मिळण्याची दाट शक्यता आहे.
आयपीएल 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्सने सुरुवात चांगली केली होती, त्यांनी पहिल्या 8 पैकी 6 सामन्यात विजय मिळवला होता. म्हणजे पहिला हाफ चांगला गेला, पण दुसऱ्या हाफमध्ये तो ट्रॅकवरून घसरला. पराभवांची अशी मालिका सुरू झाली की शेवटी हा संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही. दिल्लीने 14 पैकी 7 सामने जिंकले, तर 6 सामने गमावले. पावसामुळे एक सामना होऊ शकला नाही. पॉइंट टेबलमध्ये संघ पाचव्या क्रमांकावर राहिला.
🚨 NEW CAPTAIN FOR DELHI CAPITALS 🚨
— Tanuj (@ImTanujSingh) August 31, 2025
- Delhi Capitals most likely to get a New Captain for IPL 2026. Axar Patel to continue as player in the team. (Vaibhav Bhola/News24). pic.twitter.com/u0D24zksop
अक्षर पटेलची कामगिरी कशी होती?
अक्षर पटेलच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने आयपीएल 2025 मध्ये 12 सामन्यांपैकी 11 डावांमध्ये फक्त 263 धावा केल्या. एकही अर्धशतक झाले नाही. 12 सामन्यांपैकी 11 डावांमध्ये तो फक्त 5 विकेट घेऊ शकला. गेल्या हंगामात तो बोटाच्या दुखापतीने त्रस्त होता.
दिल्ली कॅपिटल्सचा नवा कर्णधार कोण होणार?
आता प्रश्न असा आहे की, पुढील हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार कोण होणार? या शर्यतीत एक-दोन नाही तर तीन नावे आहेत. पहिले नाव त्याच खेळाडूचे आहे जो आयपीएल 2025 मध्येही संघ व्यवस्थापनाची कर्णधारपदाची पहिली पसंती होता, परंतु त्याने कर्णधारपद स्वीकारण्यास नकार दिला. पुढील हंगामात कर्णधार म्हणून निवडले जाऊ शकणारे दुसरे तिसरे कोणी नसून केएल राहुल होते. त्याच्याशिवाय, फाफ डु प्लेसिस आणि ट्रिस्टन स्टब्स यांची नावेही या शर्यतीत आहेत. मेगा लिलावात केएल राहुलला दिल्लीने 14 कोटी रुपयांना खरेदी केले.
हे ही वाचा -





















