एक्स्प्लोर

Pat Cummins: सलग दुसऱ्या कसोटीत कांगारूंचा पराभव; तरी कर्णधार कमिन्स मायदेशी परतला, नेमकं कारण काय?

IND vs AUS: टीम इंडियानं सलग दुसऱ्या कसोटीत कांगारूंचा दारुण पराभव केला. त्यामुळे वापसीसाठी कांगारूंना पुढचे दोनही कसोटी सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकावेच लागणार आहेत.

IND vs AUS: सलग दुसरा कसोटी सामना तिसऱ्या दिवशीच गमावल्यानंतर कागांरूंसमोरील अडचणी आणखी वाढल्या आहेत. टीम इंडियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये (Border–Gavaskar Trophy) वापसीसाठी कांगारूंना पुढचे दोनही कसोटी सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकावेच लागतील. अशातच आता ऑस्ट्रेलियन संघ (Team Australia) अडचणीत सापडलेला असताना संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलिचा कर्णधार पॅट कमिन्स (Australian captain Pat Cummins) अचानक मायदेशी परतला आहे. कमिन्सच्या अचानक मायदेशी परतण्यामागे वैयक्तिक कारणं सांगितली जात आहेत. मात्र, नेमकी कारणं अद्याप समोर आलेली नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पॅट कमिन्स इंदूरमध्ये 1 मार्चपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीपूर्वी परतणार आहे. 

दोन कसोटी सामन्यांत कमिन्सनं घेतलेत फक्त 3 विकेट्स 

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सची कामगिरीही तशी फारशी चांगली नव्हती. दोन कसोटी सामन्यांत 39.66 च्या सरासरीने त्यानं केवळ तिनच विकेट्स घेतल्यात. जर कमिन्स तिसऱ्या कसोटीपूर्वी सिडनीहून परत येऊ शकला नाही, तर ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्त्वात संघ तिसऱ्या कसोटीसाठी मैदानात उतरणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, स्टीव्ह स्मिथ 2018 मध्ये सँडपेपर गेटपूर्वी संघाचा कर्णधार होता. 

टीम इंडियानं घेतला अपमानाचा बदला 

तब्बल सव्वा दोन वर्षांपूर्वी एडिलेड कसोटीत केवळ 36 धावांवर ऑलआउट झाल्यानंतर मेलबर्न कसोटीत दमदार वापसी टीम इंडियानं केली होती. अशीच काहीशी अपेक्षा भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियनं संघाकडून केली जात होती. परंतु, दिल्ली कसोटीच्या दुसऱ्या डावांत कांगारूंना टीम इंडियानं चारी मुंड्या चीत करत कांगारूंच्या अपेक्षांवर पाणी फेरलं. 

कसोटीत मालिकेत कांगारूंचा प्रत्येक प्रयत्न अयशस्वी 

नागपूर कसोटीच्या दुसऱ्या डावात 91 धावांत गुंडाळल्यानंतर दिल्लीत पोहोचलेल्या ऑस्ट्रेलियन संघाच्या कामगिरीचा आलेख पुन्हा नीचांकाकडे सरकला. कसोटीच्या तिसर्‍या दिवशी क्रिकेटच्या मैदानावर ऑस्ट्रेलियन संघाला टीम इंडियानं पराभूत केलं. भारतीय फिरकीपटूंना स्वीप आणि रिव्हर्स स्वीप करण्याची ऑस्ट्रेलियन फलंदाजांची रणनीती फारशी चालली नाही. रविवारी दुसऱ्या डावात 61/1 धावांच्या पुढे खेळायला आलेला ऑस्ट्रेलियाचा संघ 113 धावांवर गारद झाला. सकाळच्या सत्रात 87 मिनिटांच्या खेळात ऑस्ट्रेलियाचा संघानं केवळ 48 धावांत नऊ विकेट्स गमावल्या. टीम इंडियानं 63 वर्ष दिल्लीत एकही कसोटी न गमावण्याचा विक्रम कायम राखला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Navneet Kanwat : काल मुख्यमंत्र्यांकडून बदलीची घोषणा, आज अविनाश बारगळांची उचलबांगडी, नवनीत कांवत बीडचे नवे पोलीस अधीक्षक
काल मुख्यमंत्र्यांकडून बदलीची घोषणा, आज अविनाश बारगळांची उचलबांगडी, नवनीत कांवत बीडचे नवे पोलीस अधीक्षक
Suresh Dhas:  त्यांनीच ऑर्डर सोडली असेल तर आकांचे आकाही जेलमध्ये जातील: सुरेश धस
त्यांनीच ऑर्डर सोडली असेल तर आकांचे आकाही जेलमध्ये जातील: सुरेश धस
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? नाशिकनंतर मुंबईत ओबीसी नेत्यांसोबत गाठीभेटी, घडामोडींना वेग
छगन भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? नाशिकनंतर मुंबईत ओबीसी नेत्यांसोबत गाठीभेटी, घडामोडींना वेग
Success Story: पत्ताकोबीतून 54 लाखांचं उत्पन्न! सोलापूरच्या शेतकऱ्यानं 8 एकरात घेतलं उत्पादन, अडीच महिन्यात..
पत्ताकोबीतून 54 लाखांचं उत्पन्न! सोलापूरच्या शेतकऱ्यानं 8 एकरात घेतलं उत्पादन, अडीच महिन्यात..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 21 December 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12 PM 21 December 2024City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 21 डिसेंबर 2024 :  ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 21 December 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navneet Kanwat : काल मुख्यमंत्र्यांकडून बदलीची घोषणा, आज अविनाश बारगळांची उचलबांगडी, नवनीत कांवत बीडचे नवे पोलीस अधीक्षक
काल मुख्यमंत्र्यांकडून बदलीची घोषणा, आज अविनाश बारगळांची उचलबांगडी, नवनीत कांवत बीडचे नवे पोलीस अधीक्षक
Suresh Dhas:  त्यांनीच ऑर्डर सोडली असेल तर आकांचे आकाही जेलमध्ये जातील: सुरेश धस
त्यांनीच ऑर्डर सोडली असेल तर आकांचे आकाही जेलमध्ये जातील: सुरेश धस
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? नाशिकनंतर मुंबईत ओबीसी नेत्यांसोबत गाठीभेटी, घडामोडींना वेग
छगन भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? नाशिकनंतर मुंबईत ओबीसी नेत्यांसोबत गाठीभेटी, घडामोडींना वेग
Success Story: पत्ताकोबीतून 54 लाखांचं उत्पन्न! सोलापूरच्या शेतकऱ्यानं 8 एकरात घेतलं उत्पादन, अडीच महिन्यात..
पत्ताकोबीतून 54 लाखांचं उत्पन्न! सोलापूरच्या शेतकऱ्यानं 8 एकरात घेतलं उत्पादन, अडीच महिन्यात..
धनंजय मुंडे अजितदादांच्या गाडीतून फडणवीसांच्या भेटीला, भास्कर जाधव संतापले; म्हणाले, मुख्यमंत्र्यांकडून कारवाईची अपेक्षा, पण...
धनंजय मुंडे अजितदादांच्या गाडीतून फडणवीसांच्या भेटीला, भास्कर जाधव संतापले; म्हणाले, मुख्यमंत्र्यांकडून कारवाईची अपेक्षा, पण...
महायुतीत खातेवाटप नेमकं कधी होणार? भरत गोगावलेंनी स्पष्टच सांगितलं, रायगडच्या पालकमंत्रीपदावरही महत्त्वाचं भाष्य; म्हणाले...
महायुतीत खातेवाटप नेमकं कधी होणार? भरत गोगावलेंनी स्पष्टच सांगितलं, रायगडच्या पालकमंत्रीपदावरही महत्त्वाचं भाष्य; म्हणाले...
धबधब्यावर तरुण-तरुणीला विवस्त्र केले; पैसे काढून घेतले, पीडिता म्हणाली, मी विनवणी करत राहिलो, त्यांनी मला नग्न केले
धबधब्यावर तरुण-तरुणीला विवस्त्र केले; पैसे काढून घेतले, पीडिता म्हणाली, मी विनवणी करत राहिलो, त्यांनी मला नग्न केले
Mumbai Boat Accident: नौदलाच्या अधिकाऱ्याने स्वत:चा जीव देऊन मोठा अनर्थ टाळला, अन्यथा नीलकमल बोटीचा स्फोट....
नौदलाच्या अधिकाऱ्याने स्वत:चा जीव देऊन मोठा अनर्थ टाळला, अन्यथा नीलकमल बोटीचा स्फोट....
Embed widget