शाकीबचे जिगरबाज अर्धशतक, शार्दूलच्या तीन विकेट, भारताला विजयासाठी 266 धावांचे आव्हान
IND Vs BAN, Innings Highlights : शाकीब अल हसन आणि तौहीद ह्रदय यांच्या जिगरबाज फलंदाजीच्या जोरावर बांगलादेशने २६५ धावसंख्येपर्यंत मजल मारली.
IND Vs BAN, Innings Highlights : शाकीब अल हसन आणि तौहीद ह्रदय यांच्या जिगरबाज फलंदाजीच्या जोरावर बांगलादेशने २६५ धावसंख्येपर्यंत मजल मारली. खराब सुरुवातीनंतरही बांगलादेश संघाने निर्धारित ५० षटकात आठ विकेटच्या मोबदल्यात २६५ धावांपर्यंत मजल मारली. शाकीब अल हसन याने ८० तर तौहीद ह्रदय याने ५४ धावांची खेळी केली. भारताकडून शार्दूल ठाकूर याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. भारतीय संघाला विजयासाठी २६६ धावांचे आव्हान आहे.
भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारतीय गोलंदाजांनी रोहित शर्माचा निर्णय सार्थ ठरवत बांगलादेशच्या आघाडीच्या फलंदाजांना एकापाठोपाठ एक तंबूत पाठवले. अवघ्या ५९ धावांत बांगलादेश संघाने आघाडीचे चार फलंदाज गमावले. मोहम्मद शामी आणि शार्दूल ठाकूर यांनी सुरुवातीला भेदक मारा केला. सलामी लंदाज हसन याला १३ धावांवर शार्दूलने तंबूत धाडले. लिटन दास याला मोहम्मद शामीने तंबूचा रस्ता दाखववला. मेहंदी हसन मिराज याला अक्षर पटेल याने बाद केले तर अनामुल हक याला शार्दूल ठाकूर याने बाद केले.... भारतीय संघाने बांगलादेशची आघाडीची फळीला तंबूत पाठवले होते. पण कर्णधार शाकीब याने जिगरबाज खेळी केली.
एका बाजूला विकेट पडत असताना कर्णधार शाकीब हल हसन याने जिगरबाज खेळी केली. शाकीब हल हसन याला तौहीद ह्रदय याने चांगली साथ दिली. शाकीब अल हसन आणि तौहीद ह्रदय यांनी पाचव्या विकेटसाठी शतकी भागिदारी करत बांगलादेशचा डाव सावरला. ही जोडी धोकादायक होतोय असे वाटत होते, त्याचवेळा शार्दूल ठाकूर याने शाकीबला बाद केले.
शाकीब अल हसन याने ८५ चेंडूत ८० धावांची खेळ केली. या खेळीत शाकीब अल हसन याने तीन षटकार आणि सहा चौकार ठोकले. तौहीद ह्रदय याने ८१ चेंडूत ५४ धावांची संयमी खेळी केली. तौहीद ह्रदय याला मोहम्मद शामी याने तंबूत धाडले. तौहीद ह्रदय याने आपल्या खेळीत पाच चौकार आणि दोन षटकार ठोकले. एस हुसैन याला मोठी खेळी करता आली नाही.. हुसैन फक्त एका धावेवर जाडेजाच्या गोलंदाजीवर बाद झाला.
नसुन अहमद याने मेहंदी हसन याच्यासोबत अखेरीस फटकेबाजी करत धावसंख्या वाढवली नसुम अहमद याने मोक्याच्या क्षणी ४४ धावांची खेळी केली. या खेळीत नसुम याने ४५ चेंडूत सहा चौकार आणि एक षठकार लगावला. प्रसिद्ध कृष्णा याने नसुम याला बाद केले. अखेरील मेहंदी हसन आणि सकीब यांनी जोरदार फटकेबाजी करत बांगलादेशला २५० पार नेले.
गोलंदाजी शार्दूल ठाकूर सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. शार्दूल ठाकूर याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर मोहम्मद शामी याने दोन फलंदाजांना तंबूत धाडले. पदार्पण करणाऱ्या प्रसिद्ध कृष्णा याला एक विकेट मिळाली. अक्षर पटेल आणि रविंद्र जाडेजा यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.