Viral VIdeo: अर्शदीपने एका षटकात दिल्या 27 धावा, हार्दिकने दिली 'अशी' रिएक्शन; पाहा व्हायरल व्हिडीओ
Viral Video Arshdeep Singh Ind vs NZ: न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह याचं प्रदर्शन खूपच निराशाजनक राहिलं.
Viral Video Arshdeep Singh Ind vs NZ: न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह याचं प्रदर्शन खूपच निराशाजनक राहिलं. अर्शदीप सिंह चार षटकांत 51 धावा दिल्या आणि एकच विकेट घेतली. अर्शदीप सिंहने सामान्यच्या शेवटच्या षटकात एकूण 27 धावा दिल्या. अर्शदीपच्या या निराशाजनक षटकामुळे न्यूझीलंडने 176 धावांपर्यंत मजल मारली. नंतर भारतीय संघाला 9 विकेट्सवर केवळ 155 धावा करता आल्या आणि सामना 21 धावांनी गमवावा लागला.
न्यूझीलंडच्या डावाच्या 20व्या षटकात अर्शदीप सिंहने पहिला चेंडू नो-बॉल टाकला, ज्यावर डॅरिल मिशेलने षटकार ठोकला. नो-बॉल टाकल्यानंतर अर्शदीप सिंगवर दबाव स्पष्ट दिसत होता आणि मग फ्री-हिट चेंडूवर मिशेलने पुन्हा एक षटकार ठोकला. अर्शदीप सिंहने पुढच्या दोन चेंडूत एकूण दहा धावा दिल्या. नंतर अर्शदीप सिंहने थोडं सावरत डॅरिल मिशेलला शेवटच्या तीन चेंडूत केवळ सहा धावा करू दिल्या.
— Anna 24GhanteChaukanna (@Anna24GhanteCh2) January 28, 2023
— Anna 24GhanteChaukanna (@Anna24GhanteCh2) January 28, 2023
अर्शदीप सिंहच्या खराब गोलंदाजीमुळे कर्णधार हार्दिक पंड्याही (Hardik Pandya) खूप नाराज दिसला. मैदानात अर्शदीपची कामगिरी पाहून पंड्या (Hardik Pandya) निशाच झाल्याचा व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर अनेक नेटकरी देखील त्यावर टीका करत आहेत. दरम्यान, अर्शदीप सिंहने नो-बॉल टाकण्याची ही पहिलीच वेळ नाही. याच महिन्यात अर्शदीप सिंहने पुण्यात श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 सामन्यात दोन षटकांत पाच नो-बॉल टाकले होते. त्या सामन्यानंतर हार्दिकने नो-बॉल फेकणे हा गुन्हा असल्याचे म्हटले होते. अर्शदीप सिंहने सरावात आपल्या गोलंदाजीवर विशेष लक्ष दिले पाहिजे, कारण मोठ्या सामन्यांमध्ये नो-बॉल टाकल्याने भारताला असाच फटका पुन्हा बसू शकतो. गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे यांनाही अर्शदीपच्या गोलंदाजीवर खूप मेहनत घ्यावी लागणार आहे.
Viral Video Arshdeep Singh Ind vs NZ: अर्शदीपने सुरेश रैनाला टाकलं मागे
अर्शदीप सिंहने 20 व्या षटकात 27 धावा देऊन काही नको असलेली विक्रम आपल्या नावे केले आहेतले. अर्शदीप आता टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये डावाच्या 20व्या षटकात सर्वाधिक धावा देणारा भारतीय गोलंदाज बनला आहे. यात त्याने सुरेश रैनाचा विक्रम मोडला आहे. 2012 मध्ये रैनाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 26 धावा दिल्या होत्या. यासोबतच अर्शदीप सिंह हा पहिला भारतीय गोलंदाज आहे, ज्याने टी-20 क्रिकेटमध्ये दोन वेळा एका ओव्हरमध्ये 25 किंवा त्याहून अधिक धावा दिल्या आहेत.