(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs AUS | दिलासादायक! सिडनी टेस्टपूर्वी टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंचा कोरोना अहवाल निगेटिव्ह
IND vs AUS : सिडनी टेस्टपूर्वी टीम इंडियाचे सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. टीम इंडिया आज मेलबर्नहून सिडनीसाठी रवाना होणार आहे.
मेलबर्न, IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना सात जानेवारी रोजी सिडनी येथे खेळवण्यात येणार आहे. सिडनी टेस्टपूर्वी टीम इंडियासाठी एक आनंदाची बातमी आहे. टीम इंडियाचे सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. कसोटी मालिकेत सध्या दोन संघांनी 1-1 अशी बरोबरी साधली आहे. टीम इंडिया आज मेलबर्नहून सिडनीसाठी रवाना होणार आहे.
शर्मा, गिल, पंत यांची तिसऱ्या कसोटी सामन्यात लागू शकते वर्णी
सिडनी क्रिकेट ग्राउंड (एससीजी) मध्ये खेळवण्यात येणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचे पाच स्टार खेळाडू रोहित शर्मा, ऋषभ पंत, शुभमन गिल आणि पृथ्वी शॉ यांची संघात वर्णी लागू शकते. या पाच खेळाडूंचा ऑस्ट्रेलियातील एका हॉटेलमध्ये जेवतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर बीसीसीआय आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याची चौकशी सुरु केली आहे. तसेच या पाचही खेळाडूंना आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आलं आहे.
सिडनी मॉर्निग हेराल्डच्या रिपोर्टनुसार, बीसीसीआय यासंदर्भात व्यवहारिक पद्धत अवलंबणार असून पाचही खेळाडूंना बायो बबलचं नियम मोडल्याप्रकरणी दंड आकारण्यात येणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया या खेळाडूंना शिक्षा देऊ शकत नाही, कारण हे खेळाडू त्यांचे नाहीत. त्यामुळे यासंदर्भात निर्णय बीसीसीआय घेणार आहे.
दरम्यान, अशी घटना पहिल्यांदा घडत नसून याआधीही भारतीय खेळाडूंनी बायो बबलच्या प्रोटोकॉल्सचं उल्लंघन केल्याचं समोर आलं आहे. विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांनी डिसेंबरच्या सुरुवातीला सिडनीतील एका दुकानात खरेदी करताना फोटो काढला होता. तसेच अशाही चर्चा आहेत की, भारतीय संघ ब्रिस्वेनमध्ये होणाऱ्या शेवटच्या कसोटी सामन्यासाठी तिथे जाण्यास तयार नाही. त्याचं कारण म्हणजे, क्वींसलँड सरकारने लागू केलेली लॉकडाऊनची कठोर नियमावली. क्विन्सलँड सरकारने म्हटले आहे की भारतीय संघाने नियमांचे पालन न केल्यास ते खेळू शकणार नाहीत. चार सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ 1-1 च्या बरोबरीत आहे. मालिकेचा तिसरा सामना सात जानेवारीपासून सिडनी क्रिकेट मैदानावर (एससीजी) खेळला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :