Ajinkya Rahanes playing XI : अजिंक्य रहाणेने आशिया चषकासाठी प्लेईंग 11 निवडली, जितेश शर्माला वरचं स्थान, चकीत करणारी टीम!
टीम इंडियाचा धडाकेबाज खेळाडू अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane's playing XI for 2025 Asia Cup) आशिया चषकासाठी आपल्या पसंतीची प्लेईंग 11 निवडली आहे.

मुंबई : आशिया चषक स्पर्धेचा (Asia cup 2025) थरार रंगण्यास आता काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. येत्या 9 सप्टेंबरपासून यूएईमध्ये आशिया चषक टी ट्वेण्टी स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेसाठी भारताच्या 15 जणांच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्त्वात टीम इंडिया (Team India) मैदानात उतरणार आहे. भारताचा पहिला सामना 10 तारखेला यूएईविरुद्ध खेळवला जाणार आहे. तर दुसरा सामना 14 सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध दुबईत होणार आहे.
एकीकडे भारतीय संघाची घोषणा झाली असताना आता प्लेईंग इलेव्हन अर्थात अंतिम 11 जण कोण मैदानात उतरणार याची उत्सुकता आहे. भारताच्या दिग्गज खेळाडूंनी आपआपले 11 खेळाडू अर्थात प्लेईंग 11 निवडले आहेत. आता टीम इंडियाचा धडाकेबाज खेळाडू अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane's playing XI for 2025 Asia Cup) आशिया चषकासाठी आपल्या पसंतीची प्लेईंग 11 निवडली आहे.
महत्वाचं म्हणजे अजिंक्य रहाणेने प्लेईंग 11 निवडताना संजू सॅमसनला संधी मिळण्याची शक्यता नसल्याचं म्हटलं आहे. कारण शुभमन गिल टीम इंडियात परतल्यामुळे गिल आणि अभिषेक शर्मा सलामीला उतरतील, त्यामुळे संजू सॅमसनचा फलंदाजी क्रम हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण होईल. त्यावेळी जितेश शर्माला विकेटकीपर फलंदाज म्हणून संघात स्थान मिळू शकतं, असं अजिंक्य रहाणे म्हणाला.
"मला खात्री आहे की शुभमन गिल हा अभिषेक शर्मासोबत सलामीला उतण्याची शक्यता जास्त आहे. पण मला वैयक्तिकरित्या संजू सॅमसनला संघात पहायला आवडेल. कारण त्याने यापूर्वी खरोखरच चांगली कामगिरी केली आहे",” असे अजिंक्य रहाणे म्हणाला.
"संजू हा एक उत्तम टीममन आहे, त्याच्याकडे आत्मविश्वास आहे. पण टीम मॅनेजमेंटची मोठी कसोटी आहे. माझ्या मते, कदाचित संजू सॅमसन बाहेर बसेल.पण तो खेळावा आणि प्लेइंग इलेव्हनमध्ये असावा अशी माझी इच्छा आहे. पण शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा संघासाठी डावाची सुरुवात करतील"
Ajinkya Rahane's playing XI for 2025 Asia Cup: अजिंक्य रहाणेची प्लेईंग 11
शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, जितेश शर्मा (विकेटकीपर), अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती/हर्षित राणा.
आशिया चषकासाठी भारतीय संघ (Asia Cup Team India)
फलंदाज : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, रिंकू सिंग.
अष्टपैलू : हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल.
यष्टिरक्षक : संजू सॅमसन, जितेश शर्मा.
गोलंदाज : जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, हर्षित राणा.
आशिया कपमधील भारताचे वेळापत्रक (Asia Cup time table India)
10 सप्टेंबर - विरुद्ध यूएई (दुबई)
14 सप्टेंबर - विरुद्ध पाकिस्तान (दुबई)
19 सप्टेंबर - विरुद्ध ओमान (अबू धाबी)
आशिया कप 2025 – संपूर्ण वेळापत्रक (ग्रुप स्टेज) (Asia Cup 2025 Full Schedule)
9 सप्टेंबर – अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग
10 सप्टेंबर – भारत विरुद्ध यूएई
11 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग
12 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध ओमान
13 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध श्रीलंका
14 सप्टेंबर – भारत विरुद्ध पाकिस्तान
15 सप्टेंबर – यूएई विरुद्ध ओमान
15 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध हाँगकाँग
16 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान
17 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध यूएई
18 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान
19 सप्टेंबर – भारत विरुद्ध ओमान
संबंधित बातम्या
Asia Cup : भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार की नाही, केंद्राचा मोठा निर्णय!




















