एक्स्प्लोर

Ranji Trophy : हरियाणाच्या पोरांनी मुंबईला फुटला घाम, सूर्यकुमार, रहाणे सगळेच फेल; आता मुंबईपुढे करो या मरो!

2024-25 च्या रणजी ट्रॉफीच्या तिसऱ्या क्वार्टरफायनल सामन्यात हरियाणाच्या पोरांनी गतविजेत्या मुंबईला गुडघे टेकण्यास भाग पाडले.

Mumbai vs Haryana Ranji Trophy Quarterfinal : 2024-25 च्या रणजी ट्रॉफीच्या तिसऱ्या क्वार्टरफायनल सामन्यात हरियाणाच्या पोरांनी गतविजेत्या मुंबईला गुडघे टेकण्यास भाग पाडले. नॉकआउट सामना 8 फेब्रुवारी रोजी कोलकात्यातील ईडन गार्डन्स येथे सुरू झाला, ज्यामध्ये मुंबईने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेचा हा निर्णय एकदम चुकीचा ठरला. परिस्थिती अशी आहे की मुंबईच्या अर्ध्याहून अधिक संघ 100 धावांचा टप्पा गाठण्यापूर्वीच पॅव्हेलियनमध्ये परतला आहे.

रहाणे-दुबे आणि सूर्यकुमार हे सर्व ठरले अपयशी...

हरियाणाच्या अंशुल कंबोजच्या घातक गोलंदाजीसमोर मुंबईच्या फलंदाजांना संघर्ष करावा लागला. मुंबई संघाची सुरुवात इतकी खराब झाली की, टॉप ऑर्डरचे तिन्ही फलंदाज फक्त 14 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले आणि तिघेही क्लीन बोल्ड झाले. अजिंक्य रहाणेने काही काळ एका टोकाला होता, परंतु सुमित कुमारने त्याला 31 धावांवर क्लीन बोल्ड केले.

25 धावा होईपर्यंत मुंबई संघाने चार विकेट गमावल्या होत्या. दरम्यान, अजिंक्य रहाणे आणि शिवम दुबे यांच्यात 40 धावांची छोटी पण महत्त्वाची भागीदारी झाली. पण दुबे जास्त काळ क्रीजवर राहू शकला नाही आणि 28 धावा करून बाद झाला. 94 धावसंख्येपर्यंत मुंबई संघाने 6 विकेट गमावल्या आहेत. भारताच्या टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवही मुंबईकडून खेळत आहे, पण त्याचा खराब फॉर्म अजूनही सुरूच आहे. सूर्या फक्त 9 धावा करून बाद झाला.

मुंबई रणजी ट्रॉफीमध्ये गतविजेता आहे, गेल्या हंगामात अंतिम सामन्यात विदर्भाला 169 धावांनी हरवून त्यांनी 42 व्यांदा रणजी ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले. इतर उपांत्यपूर्व सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर, जम्मू आणि काश्मीरचा सामना केरळशी होईल, तामिळनाडूचा सामना विदर्भाशी होईल आणि सौराष्ट्राचा सामना गुजरातशी होईल. मुंबईचा सामना हरियाणा विरुद्ध खेळला जात आहे.

उपांत्यपूर्व सामन्यांसाठी मुंबईचा संघ -

अजिंक्य रहाणे (कर्णधार), आयुष म्हात्रे, अंगकृष रघुवंशी, सूर्यकुमार यादव, अमोघा भटकळ, सिद्धेश लाड, शिवम दुबे, हार्दिक तामोरे (यष्टीरक्षक), आकाश आनंद (यष्टीरक्षक), सूर्यांश शेडगे, शार्दुल ठाकूर, शम्स मुलानी, तनुष कोटियन, मोहित अवस्थी, सिल्वेस्टर डिसूझा, रॉयस्टन डायस, अथर्व अंकोलेकर, हर्ष तन्ना.

उपांत्यपूर्व सामन्यांसाठी हरियाणाचा संघ -

लक्ष्य दलाल, अंकित कुमार (कर्णधार), युवराज योगेंद्र सिंग, हिमांशू राणा, निशांत सिंधू, धीरू सिंग, रोहित प्रमोद शर्मा (यष्टीरक्षक), जयंत यादव, अंशुल कंबोज, अनुज ठकराल, अजित चहल, अशोक मेनारिया, युजवेंद्र चहल, हर्षल पटेल, अमन कुमार, कपिल हुडा, सुमित कुमार, मयंक शांडिल्य.

हे ही वाचा -

Champions Trophy 2025 : 'टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीत पराभूत होणार तर....', पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूच्या भविष्यवाणीनं सर्वांच्याच भुवया उंचावल्या!

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Australia : बांगलादेशकडून झालेला पराभव जिव्हारी लागला, ऑस्ट्रेलियानं सलामीवीराला थेट घरचा रस्ता दाखवला, दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर 
ऑस्ट्रेलियानं सलामीवीर बदलला, अपयशी खेळाडूला थेट घरचा रस्ता दाखवला, दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
BCCIच्या अंपायरच्या तोंडावर लागला चेंडू! मैदानावरील सगळेच घाबरले; थेट ICUमध्ये दाखल; VIDEO पाहून धडकी भरेल
BCCIच्या अंपायरच्या तोंडावर लागला चेंडू! मैदानावरील सगळेच घाबरले; थेट ICUमध्ये दाखल; VIDEO पाहून धडकी भरेल
IND vs SL 1st Test DAY-4 : चौथ्या दिवसअखेर भारत वरचढ; पण श्रीलंकेची झुंज कायम! 288 धावा की 6 विकेट्स... आता पाचव्या दिवशी कोण मारणार बाजी?
चौथ्या दिवसअखेर भारत वरचढ; पण श्रीलंकेची झुंज कायम! 288 धावा की 6 विकेट्स... आता पाचव्या दिवशी कोण मारणार बाजी?

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget