Ajinkya Rahane : मराठमोळ्या अजिंक्य रहाणेचा नवा अवतार, सातासमुद्रापार ठोकलं चौकार पेक्षा जास्त षटकार - Video
Ajinkya Rahane Batting Video : सातासमुद्रापार लीसेस्टरशायर आणि हॅम्पशायर यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीत अजिंक्य रहाणेने जबरदस्त फॉर्म दाखवला.
Ajinkya Rahane : टीम इंडियातून बाहेर असलेल्या अजिंक्य रहाणेने इंग्लंडमध्ये आपली स्फोटक कामगिरी सुरूच ठेवली आहे. रहाणेने लीसेस्टरशायरकडून खेळताना सलग दुसरे अर्धशतक ठोकले. अजिंक्य रहाणे, पीटर हँड्सकॉम्ब आणि लियाम ट्रेव्हस्किस यांच्या अर्धशतकांच्या जोरावर लेस्टरशायरने शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात हॅम्पशायरचा तीन गडी राखून पराभव केला. या विजयासह गतविजेत्या लीसेस्टरशायरने मेट्रो बँक वन डे चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
प्रथम फलंदाजी करताना कर्णधार निक गुबिन्सचे शानदार शतक आणि अनुभवी लियामच्या अर्धशतकाच्या जोरावर हॅम्पशायर संघाने निर्धारित 50 षटकांत सात गडी गमावून 290 धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभारली. 18 वर्षीय युवा डॉमिनिकनेही डावाच्या शेवटी 20 चेंडूत 39 धावांची तुफानी खेळी केली. लीसेस्टरशायरसाठी टॉम स्क्रिव्हनने तीन विकेट घेतल्या, तर ख्रिस राइटने दोन विकेट घेतल्या.
रहाणे आणि हँड्सकॉम्ब यांच्यात शतकी भागीदारी
प्रत्युत्तर एके काळी लीसेस्टरशायर संघ संघर्ष करताना दिसत होता, अवघ्या 30 धावांत तीन विकेट गमावल्या होत्या, परंतु रहाणे आणि हँड्सकॉम्ब यांच्यातील सलग दुसरी शतकी भागीदारी करत संघांला विजया पर्यंत नेले. रहाणेने 70 धावांची खेळी खेळली, या खेळीत त्याने दोन चौकार आणि तीन षटकार मारले. या मोसमातील अजिंक्य रहाणेचे हे चौथे आणि सलग दुसरे अर्धशतक आहे. रहाणेने नऊ सामन्यांमध्ये 375 धावा केल्या आहेत.
A fourth half-century of the Metro Bank for Ajinkya Rahane.
— Metro Bank One Day Cup (@onedaycup) August 16, 2024
70 crucial runs in Leicestershire's quarter-final against Hampshire.
Check out all five boundaries here including his straight six... pic.twitter.com/gOfY3cEhMU
जुन्या रंगात दिसला रहाणे!
अजून दोन सामने बाकी आहेत. रहाणेने आपली आक्रमक शैली सुरू ठेवल्यास आयपीएल 2025 मध्ये रहाणेसाठी पुन्हा एकदा बोली लागू शकते. आयपीएल 2024 मध्ये रहाणे विशेष काही करू शकला नाही. पण 2023 मध्ये त्याने आपल्या स्फोटक फलंदाजीने सर्वांना चकित केले होते.
संबंधित बातमी :
Ishan Kishan : शतक ठोकलं तरी फायदा नाही...?; BCCI ने इशान किशनला दिला कडक शब्दात इशारा
Ishan Kishan : इशान किशनमुळे दोन खेळाडू टेन्शनमध्ये! निवडकर्त्यांची वाढली डोकेदुखी; बांगलादेशविरुद्ध कोणाला मिळणार संधी?ॉपंजाब किंग्सच्या मालकांमध्ये जोरदार भांडण, प्रिती झिंटा कोर्टात पोहोचली; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण