पंजाब किंग्सच्या मालकांमध्ये जोरदार भांडण, प्रिती झिंटा कोर्टात पोहोचली; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
IPL Punjab Kings Prity Zinta: आयपीएलमधील संघ पंजाब किंग्सच्या मालकांमध्ये जोरदार वाद झाल्याची माहिती समोर आली आहे
IPL Punjab Kings: आयपीएलमधील संघ पंजाब किंग्सच्या मालकांमध्ये जोरदार वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. पंजाब किंग्सच्या मालकांमधील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. प्रिती झिंटाची केपीएच ड्रीम क्रिकेट प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून पंजाब किंग्स फ्रँचायझीमध्ये 23 टक्के भागेदारी आहे. मोहित बर्मन यांनी सहमालकांमध्ये झालेल्या कराराचं उल्लंघन करत 11.5 टक्के शेअर विकण्याचा प्रयत्न केला, असा आरोप प्रिती झिंटाने केला आहे.
पंजाब किंग्स संघाचे (Punjab Kings) सहमालक मोहित बर्मन यांनी क्रिकबझला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, त्यांनी आपले शेअर विकण्याचा कधीही विचार केलेला नाही. हे प्रकरण आता न्यायप्रविष्ठ आहे. तसेच या प्रकरणाची सुनावणी 20 ऑगस्टला होणार आहे. दरम्यान मोहित बर्मन यांच्याकडे KPH ड्रीम क्रिकेट प्रायव्हेट लिमिटेडमध्ये 48 टक्के सर्वात मोठी भागीदारी आहे. नेस वाडिया गटातील तिसरे मालक आहेत, त्यांच्याकडे 23 टक्के भागिदारी आहे, तर उर्वरित शेअर्स चौथे मालक करण पॉल यांच्याकडे आहेत. तर प्रिती झिंटा (Prity Zinta) यांच्याकडे देखील 23 टक्के भागिदारी आहे.
आयपीएलमध्ये पंजाब किंग्स फ्लॉप
पंजाब किंग्स हा आयपीएलच्या आठ संघांपैकी एक आहे. आयपीएलच्या 17 वर्षांच्या इतिहासात पंजाब किंग्सची कामगिरी अत्यंत खराब राहिली आहे. कोलकाता नाईट रायडर्सला हरवून या संघाला फक्त एकदाच अंतिम फेरी गाठता आली. याशिवाय पंजाब किंग्सचा संघ केवळ एकदाच आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये पोहोचला.
या आधी शाहरुख खान अन् नेस वाडिया यांच्यात वाद-
31 जुलै रोजी मुंबईतील बीसीसीआयच्या मुख्यलयात ही बैठक झाली. या बैठकीत कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघाचे मालक शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि पंजाब किंग्सचे (Punjab Kings) मालक नेस वाडिया (Ness Wadia) यांच्यात जोरदार वाद झाल्याची माहिती समोर येत आहे. क्रिकबझने एक अहवालानूसार, शाहरुख खानसह काही लोक मेगा लिलाव आयोजित न करण्याच्या बाजूने आहेत. बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, खानचे पंजाब किंग्जचे सहमालक नेस वाडिया यांच्याशी एकदा जोरदार वाद झाला. किती खेळाडू कायम ठेवायचे हे त्यांच्या वादाचे कारण होते. एकीकडे शाहरुख खान अधिक खेळाडूंना कायम ठेवण्याच्या बाजूने असल्याचे दिसून आले. परंतु नेस वाडिया यांना संघांना अधिक खेळाडू ठेवण्याच्या बाजून नव्हते.
20 टक्के पगाराची मर्यादा वाढण्याची शक्यता
क्रिकबझने दिलेल्या माहितीनुसार, सर्व 10 फ्रँचायझींच्या मालकांनी बीसीसीआयकडे पगाराची मर्यादा 20 टक्क्यांनी वाढवण्याची मागणी केलीय. 2023 ते 2024 पर्यंत पगाराची मर्यादा 5 टक्क्यांनी वाढवण्यात आली . म्हणजे 95 कोटींवरून 100 कोटींवर करण्यात आली होती. आता यामध्ये 20 टक्के आणखी वाढ करण्याची मागणी कऱण्यात आली आहे. IPL 2025 च्या मेगा लिलावापूर्वी पगाराची मर्यादा किमान 10 टक्क्यांनी वाढू शकते असा अंदाज आहे. म्हणजेच 10 संघांची एकूण पगाराची मर्यादा पाहिल्यास रक्कम 10 अब्ज रुपयांपेक्षा जास्त जाण्याची शक्यता आहे.