Ishan Kishan : इशान किशनमुळे दोन खेळाडू टेन्शनमध्ये! निवडकर्त्यांची वाढली डोकेदुखी; बांगलादेशविरुद्ध कोणाला मिळणार संधी?
Ishan Kishan Buchi Babu Tournament : जवळपास 8 महिने टीम इंडियातून बाहेर असलेल्या इशान किशनने या स्पर्धेत झारखंडकडून खेळताना मध्य प्रदेशविरुद्ध 107 चेंडूत 114 धावांची शानदार खेळी केली.
India vs Bangladesh Test : भारतीय संघातून बराच काळ बाहेर असलेला इशान किशन नुकताच पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात परतला. बुची बाबू या स्पर्धेत तो झारखंडचे नेतृत्व करत आहे. तेथे शानदार शतक झळकावून इशान किशनने निवड समिती ऋषभ पंत आणि केएल राहुल यांची डोकेदुखी वाढवली आहे. जवळपास 8 महिने टीम इंडियातून बाहेर असलेल्या इशान किशनने या स्पर्धेत झारखंडकडून खेळताना मध्य प्रदेशविरुद्ध 107 चेंडूत 114 धावांची शानदार खेळी केली. या खेळीच्या जोरावर त्याने पुन्हा एकदा टीम इंडियाचे पुनरागमनाचे दरवाजे ठोठावले आहेत.
मानसिक थकव्यामुळे इशानने गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात ब्रेक घेतला होता, मात्र त्यानंतर तो देशांतर्गत क्रिकेट खेळला नाही आणि थेट आयपीएलमध्ये भाग घेतला. याची किंमत त्याला केंद्रीय करारातून बाहेर पडून चुकवावी लागली. खेळाडूंची अशी वृत्ती पाहून बीसीसीआयने एक नियम तयार केला. ज्यामध्ये टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटमध्ये कामगिरी करावी लागेल. आता इशान किशनने लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये धावा केल्यामुळे त्याला बांगलादेश मालिकेत संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
खरंतर, केएल राहुल टीम इंडियाचा नियमित विकेटकीपर नाही. यंदा आयपीएलपूर्वी कामाचा ताण लक्षात घेऊन इंग्लंडविरुद्धच्या घरच्या मालिकेतही त्याची निवड झाली नव्हती. त्याच्या जागी ध्रुव जुरेलची निवड करण्यात आली. तर ऋषभ पंत दुखापतीनंतर पुनरागमन करत आहे. टी-20 वर्ल्ड कपनंतर त्याने एकदिवसीय संघातही पुनरागमन केले आहे, मात्र तो कसोटी क्रिकेटसाठी कितपत तंदुरुस्त आहे, याकडे निवड समितीचे लक्ष असेल.
जर ऋषभ पंत पूर्णपणे तंदुरुस्त असेल तर त्याची बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत निश्चितपणे निवड होईल, तर इंग्लंडविरुद्ध चमकदार कामगिरी केल्यामुळे ध्रुव जुरेलला पण आणखी काही संधी दिलल्या जाऊ शकते. अशा परिस्थितीत इशान किशनचा पत्ता कट जाऊ शकतो. पण ऋषभ पंतच्या फिटनेसमध्ये काही कमतरता आढळून आल्यास इशान किशनच्या पुनरागमनाच्या आशा उंचावल्या जाऊ शकतात.