WPL 2023 : बायकोच्या वाढदिवसासाठी भारतातच थांबला मिचेल स्टार्क, युपीची कर्णधार एलिसाचा बर्थ-डे जोमात साजरा
Womens Premier League : महिला प्रिमीयर लीगमध्ये यूपी वॉरियर्सची कर्णधार एलिसा हेलीने आज (24 मार्च) तिचा 33 वा वाढदिवस साजरा केला.
Womens Premier League 2023 : ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघातील स्टा खेळाडू अॅलिसा हीली (alyssa healy) सध्या भारतात महिला प्रीमियर लीग (WPL) च्या पहिल्या हंगामात सहभागी झाली आहे. या स्पर्धेमध्ये ती यूपी वॉरियर्स (UP Warriors) संघाचं नेतृत्व करत आहे. दरम्यान, आज 24 मार्च रोजी एलिसा हिलीने तिचा 33 वा वाढदिवस साजरा केला, ज्यामध्ये तिचा पती आणि ऑस्ट्रेलियन पुरुष क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क (Mitchell Starc) देखील उपस्थित होता. यूपी वॉरियर्स संघाचा एक भाग असलेल्या लॉरेन बेलने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक खास स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये त्यात स्टार्क पत्नी एलिसाच्या चेहऱ्यावर केक लावताना दिसत आहे.
पाहा Photo :
Alyssa Healy in the Birthday Vibe ❤️#WPL | #WPL2023 | #CricketTwitter pic.twitter.com/UuBOcCeMbM
— Krish (@archer_KC14) March 24, 2023
तर मिचेल स्टार्क हा देखील भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियन पुरुष संघाचा एक भाग होता, ज्याने काही दिवसांपूर्वी संपलेल्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत कांगारू संघाला 2-1 ने विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही स्टार्कने 5 विकेटेस घेत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. दरम्यान मालिकेनंतर बहुतांश ऑस्ट्रेलियन खेळाडू मायदेशी परतत असताना स्टार्क पत्नीचे सामने सुरु असल्यामुळे भारताच थांबला आहे. दरम्यान अॅलिसाच्या कारकिर्दीचा विचार केल्यासअॅलिसा हिलीने या मोसमात आतापर्यंत कर्णधार म्हणून चांगली कामगिरी केली आहे, ज्यामध्ये तिने 8 डावात बॅटने 34.57 च्या सरासरीने एकूण 242 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये तिच्या बॅटने 2 अर्धशतक ठोकली आहेत. यादरम्यान हीलीने एका सामन्यात केवळ 47 चेंडूत 96 धावांची शानदार खेळी देखील केली.
आज युपी विरुद्ध मुंबई सामना रंगणार
महिला प्रीमियर लीग 2023 चा (WPL 2023) पहिला सीझन आता संपत आला आहे. लीगचा प्लेऑफ सामना म्हणजेच एलिमिनेटर सामना 24 मार्च रोजी मुंबई इंडियन्स आणि युपी वॉरियर्सच्या (MI vs UPW) महिला संघांमध्ये खेळवला जाईल. दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर होणार आहे. हा प्लेऑफ सामना दोन्ही संघांसाठी करो किंवा मरो असा आहे. हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सशी भिडणार आहे. चांगल्या नेट रनरेटच्या आधारे दिल्लीचा संघ आधीच अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. प्लेऑफ सामन्यात मुंबई आणि यूपी यांच्यात निकालाची लढत होणार आहे.
हे देखील वाचा-