एक्स्प्लोर

IND vs AUS: सूर्यकुमारच्या बचावासाठी कपिल देव सरसावले, संजू सॅमसनशी तुलनेबाबत म्हणाले...

India vs Australia : ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत कोणत्याही एका खेळाडूच्या कामगिरीची सर्वाधिक चर्चा होत आहे, ती म्हणजे सूर्यकुमार यादव. कारण सूर्या तिन्ही सामन्यात शून्यावर बाद झाला.

Kapil Dev On Suryakumar Yadav : भारतीय खेळाडू सूर्यकुमार यादवसाठी (Suryakumar Yadav) ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकतीच संपलेली तीन सामन्यांची वनडे मालिका एखाद्या वाईट स्वप्नासारखी होती. या मालिकेतील सर्व सामन्यांमध्ये सूर्या पहिल्याच चेंडूवर खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर सोशल मीडियावरही त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. दरम्यान, विश्वविजेता कर्णधार आणि माजी भारतीय खेळाडू कपिल देव यांनी सूर्याचा बचाव करताना संजू सॅमसनशी त्याची तुलना करू नका, असंही म्हटले आहे.

एबीपी न्यूजशी विशेष संवाद साधताना सूर्याच्या कामगिरीबद्दल कपिल देव म्हणाले की, ज्या खेळाडूने चांगली कामगिरी केली आहे त्याला अधिक संधी द्यायला तुम्हाला नेहमीच आवडेल. यावेळी तुम्ही सूर्यकुमार यादवची तुलना संजू सॅमसनसोबत करू नये. जर सॅमसन अशा फॉर्ममधून जात असेल तर तुम्ही इतर कोणाबद्दल बोलू लागला असता. असे अजिबात होऊ नये. या वक्तव्यादरम्यान कपिल देव यांनी संघ व्यवस्थापन आणि कर्णधार रोहित शर्माच्या निर्णयाचा बचाव करत म्हटले की, संघ व्यवस्थापनाने सूर्यकुमार यादवला अधिक संधी देण्याचा निर्णय घेतला असेल, तर लोक काहीही बोलत असतील तरी शेवटी काय करायचं हा पूर्णपणे व्यवस्थापनाचा निर्णय असेल.

टी20 मध्ये हिट पण ODI मध्ये फक्त 24 ची सरासरी

सध्या, सूर्यकुमार यादव आयसीसी वर्ल्ड टी-20 फलंदाजी क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे आणि या मागचे सर्वात मोठे कारण म्हणजे गेल्या 1 ते 2 वर्षातील त्याची या फॉरमॅटमधील उत्कृष्ट कामगिरी. सूर्याने आतापर्यंत 48 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 46.53 च्या सरासरीने एकूण 1675 धावा केल्या आहेत, ज्यात 3 शतकांसह 13 अर्धशतकांचा समावेश आहे. दुसरीकडे, जर आपण सूर्याचा एकदिवसीय विक्रम पाहिला तर त्याची 23 सामन्यांत केवळ 24ची सरासरी आहे, ज्यामध्ये केवळ 2 अर्धशतकांचा समावेश आहे.

गोल्डन डकचा नकोसा विक्रम सूर्यासह मास्टर ब्लास्टरच्याही नावावर

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना चेन्नईत खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियन अष्टपैलू अॅस्टन अगरनं पहिल्याच चेंडूवर माघारी धाडलं. सूर्या आऊट झाला अन् त्यानं 'गोल्डन डक'च्या हॅट्रिकचा विक्रम आपल्या नावावर रचला. मात्र, सूर्याच्या आधीही अनेक भारतीय फलंदाजांनी वनडेमध्ये गोल्डन डकची हॅट्रिक केली आहे. या यादीत सर्वात मोठं नाव आहे, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. जो 1994 मध्ये सलग तीन एकदिवसीय सामन्यांत शून्यावर बाद झाला होता. त्यानंतर अनिल कुंबळे, झहीर खान, इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांनीही वनडेत शून्यावर बाद होण्याची हॅट्ट्रिक रचली आहेच.

हे देखील वाचा-

 

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ 4th ODI : पहिल्यांदा रोहितने घात केला, पुढच्याच चेंडूवर इशाननेही तीच चूक केली; दुसऱ्या षटाकात नेमकं काय घडलं? आकिब नबी रागाने पाहतच राहिला, VIDEO
पहिल्यांदा रोहितने घात केला, पुढच्याच चेंडूवर इशाननेही तीच चूक केली; दुसऱ्या षटाकात नेमकं काय घडलं? आकिब नबी रागाने पाहतच राहिला, VIDEO
IND vs NZ 4th ODI : कर्णधार बदलला, खेळाडू बदलले! न्यूझीलंडविरुद्ध चौथ्या वनडे सामन्यासाठी टीम इंडियाची Playing XI जाहीर; एक, दोन नाही तर 3 खेळाडू OUT
कर्णधार बदलला, खेळाडू बदलले! न्यूझीलंडविरुद्ध चौथ्या वनडे सामन्यासाठी टीम इंडियाची Playing XI जाहीर; एक, दोन नाही तर 3 खेळाडू OUT
IND vs NZ 4th ODI LIVE : नाणेफेक जिंकताच श्रेयसचा मोठा डाव! ऋतुराज-ईशानची एन्ट्री, न्यूझीलंडने एकाच वेळी बदलले 6 खेळाडू, जाणून घ्या LIVE अपडेट
IND vs NZ 4th ODI LIVE : नाणेफेक जिंकताच श्रेयसचा मोठा डाव! ऋतुराज-ईशानची एन्ट्री, न्यूझीलंडने एकाच वेळी बदलले 6 खेळाडू, जाणून घ्या LIVE अपडेट
Ind vs Pak U19 Asia Cup 2026 Final : पाकिस्तानने भारताला 191 धावांनी रडवलं होतं, आता बदला घेण्याची वेळ! फायनलआधी कर्णधार काय म्हणाला?
पाकिस्तानने भारताला 191 धावांनी रडवलं होतं, आता बदला घेण्याची वेळ! फायनलआधी कर्णधार काय म्हणाला?

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati Farmer: अमरावतीत मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यानं स्वतःला विहिरीत झोकून दिलं;पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून गंभीर दखल, म्हणाले...
अमरावतीत मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यानं स्वतःला विहिरीत झोकून दिलं; पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून गंभीर दखल, म्हणाले...
Nvidia :  एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं, जेनसेन हुआंगच्या अडचणीत वाढ
एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं
Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
Nagpur Hotel Fire : नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
NCP Merger : माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला,सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य
माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला, सुप्रिया सुळेंचं विलिनीकरणावर स्पष्ट मत
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, IBJA कडून दर जाहीर, डिसेंबरमध्ये सोनं दीड लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा अंदाज
सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 3901 रुपयांनी स्वस्त, IBJA कडून दर जाहीर
Satej Patil and Hasan Mushrif: हसन मुश्रीफ म्हणाले, रागाच्या भरात चूक झाली; सतेज पाटीलही एक पाऊल पुढे टाकत म्हणाले....
हसन मुश्रीफ म्हणाले, रागाच्या भरात चूक झाली; सतेज पाटीलही एक पाऊल पुढे टाकत म्हणाले....
Embed widget