रोहित-इशानमुळे भारताच्या नावावर लाजीरवाणा विक्रम, 1983 वर्ल्डकपनंतर ओढावली नामुष्की
Rohit Sharma And Virat Kohli : वनडे वर्ल्ड कप 2023 च्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाच्या नावावर लाजीरवाणा विक्रम नोंदवला आहे.
Rohit Sharma And Virat Kohli : वनडे वर्ल्ड कप 2023 च्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाच्या नावावर लाजीरवाणा विक्रम नोंदवला आहे. ऑस्ट्रेलियाविोरधात चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सुरु असलेल्या सामन्यात भारतीय सलामी फलंदाज खातेही न उघडता तंबूत परतले. ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आणि जोश हेजलवूड यांनी भारतीय सलामी फलंदाजांना शून्यावर तंबूत धाडले. विश्वचषकात 40 वर्षानंतर हा लाजीरवाणा विक्रम भारतीय संघाच्या नावावर जमा झाला आहे. रोहित शर्मा आणि ईशान किशन हे दोन्ही सलामी फलंदाज गोल्डन डकचे शिकार ठरले. याआधी 1983 च्या विश्वचषकात असा लाजीरवाणा रेकॉर्ड झाला होता. याची पुनरावृत्ती आज झाली.
शुभमन गिलच्या अनुपस्थितीत इशान किशन रोहित शर्माच्या साथीने डावाची सुरुवात करण्यास उतरला. पण पहिल्याच षटकात इशान किशन बाद झाला. मिचेल स्टार्कच्या चेंडूवर इशान किशनला खातेही उघडता आले नाही. स्लिपमध्ये असलेल्या कॅमरुन ग्रीनच्या हातात झेल देऊन इशान तंबूत परतला. त्यानंतर दुसऱ्याच षटकात रोहित शर्माही शून्यावर तंबूत परतला. जोश हेजलवूडच्या तिसऱ्या चेंडूवर रोहित शर्मा एलबीडब्ल्यू होऊन तंबूत परतला. रोहित शर्माने सहा चेंडूचा सामना केला, पण विकेट घेण्यात अपयश आले.
याआधी 1983 च्या विश्वचषकात भारतीय सलामी फलदाज झिम्बॉब्वेच्या गोलंदाजाविरोधात शून्यावर तंबूत परतले होते. झिम्बॉब्वेच्या भेदक माऱ्यापुढे भारतीय फंलदाजांनी नांगी टाकली होती. भारतीय सलामी फलंदाज सुनील गावसकर आणि के श्रीकांत यांना एकही धाव काढता आली नाही. टुनब्रिज येथे झालेल्या सामन्यात दुसऱ्या चेंडूव गावसकर शून्यावर तंबूत परतले होते. तर 13 व्या चेंडूवर श्रीकांत बाद झाला होता.
वर्ल्ड कपमध्ये शून्याव बाद होणारे दोन्ही भारतीय सलामी फलंदाज -
झिम्बाब्वे विरोधात 1983 वर्ल्ड कपमध्ये- टुनब्रिज
ऑस्ट्रेलियाविरोधात 2023 वर्ल्ड कपमध्ये- चेन्नई.
दोन धावांत तीन फलंदाज शून्यावर बाद -
भारताचा सलामीवीर रोहित शर्मा, ईशान किशन आणि त्यानंतर आलेला श्रेयस सुद्धा अगदी खातं न उघडताच तांबूत परतल्याने भारताची अवस्था तीन बाद दोन धावा अशी झाली. ऑस्ट्रेलियाच्या मिशेल स्टार्कने चौथ्याच चेंडूवर इशान किशनला भोपळाही फोडू न देता माघारी धाडले. त्यानंतर दुसऱ्या षटकात हेजलवुडने तगडा हादरा दिला. कप्तान रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरला एकाच ओव्हरमध्ये माघारी धाडत भारताची अवस्था 3 बाद 2 धावा अशी करून टाकली.
Duck for Kishan.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 8, 2023
Duck for Rohit Sharma.
Duck for shreyas Iyer.
India 2/3 in the World Cup against Australia. pic.twitter.com/vOaFA9JXE2