MS Dhoni's Wax Statue: धोनीचा मेणाचा पुतळा बनवणाऱ्यावर चाहते भडकले; सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस सुरूच!
MS Dhoni's Wax Statue: भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची आजही जगातील उत्कृष्ट कर्णधारांमध्ये यादीत गणना केली जाते. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ दोन वेळा विश्वविजेताही झाला
![MS Dhoni's Wax Statue: धोनीचा मेणाचा पुतळा बनवणाऱ्यावर चाहते भडकले; सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस सुरूच! A picture of Mahendra Singh Dhoni's wax statute in Karnataka's Mysore is going viral on the internet MS Dhoni's Wax Statue: धोनीचा मेणाचा पुतळा बनवणाऱ्यावर चाहते भडकले; सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस सुरूच!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/08/0aaba85bea979b6093ad88032d3928471665222576838266_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
MS Dhoni's Wax Statue: भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची आजही जगातील उत्कृष्ट कर्णधारांमध्ये यादीत गणना केली जाते. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ दोन वेळा विश्वविजेताही झाला. धोनीनं 15 ऑगस्ट 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं होतं. मात्र, अजूनही त्याच्या चाहत्यांमध्ये कोणतीही कमतरता जाणवली नाही. कर्नाटकातील म्हैसूर येथील चामुंडेश्वरी वॅक्स म्युझियमनं एमएस धोनीच्या मेणाच्या पुतळ्याचं अनावरण केलं, ज्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून या पुतळ्यावर धोनीचे चाहत्यांकडून संतप्तजनक प्रतिक्रिया देत आहेत.
दरम्यान, धोनीचा हा पुतळा पाहिल्यानंतर त्याचे चाहते मीम्सच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करत आहेत. हा पुतळा धोनीसारखा दिसत नाही, असं अनेकांचं मत आहे. तर काहींनी धोनीच्या मेणाच्या पुतळा पाकिस्तानच्या खेळाडूसारखा दिसत असल्याचा दावा केला आहे.
ट्वीट-
Shoaib malik in indian cricket team jersey with diffrent hair style https://t.co/wMhx8SDFKC
— harRy (@HarRyMa52256977) October 7, 2022
ट्वीट-
MS Dhoni wax statue in Mysore. pic.twitter.com/KdsKcPLsaM
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 7, 2022
ट्वीट-
MS Dhoni wax statue in Mysore. pic.twitter.com/KdsKcPLsaM
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 7, 2022
धोनीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
महेंद्र सिंह धोनीने त्याच्या कारकिर्दीत 90 कसोटी, 350 एकदिवसीय आणि 98 टी-20 सामने खेळले आहेत. कसोटी सामन्यांमध्ये त्यानं 6 शतक, एक द्विशतक, 33 अर्धशतक केलं आहेत. त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 4 हजार 876 धावा केल्या आहेत. त्यानं एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकूण 10 हजार 773 धावा केल्या आहेत. यामध्ये 10 शतक, 79 अर्धशतकांचा समावेश आहे. तर, टी-20 क्रिकेटमध्ये त्यानं एकूण 1 हजार 617 धावा केल्या आहेत. धोनीनं 190 आयपीएल सामने खेळले. यामध्ये त्याने एकूण 4 हजार 432 धावा केल्या आहेत.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)