(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Harbhaja Singh: हरभजन सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त; जाणून घ्या भज्जीची 23 वर्षांची कारकिर्द
Harbhaja Singh: भारताचा फिरकीपटू हरभजन सिंहनं क्रिकेटला आज (शुक्रवारी, 24 डिसेंबर) अलविदा केलाय.
Harbhaja Singh: भारताचा फिरकीपटू हरभजन सिंहनं क्रिकेटला आज (शुक्रवारी, 24 डिसेंबर) अलविदा केलाय. त्यानं 23 वर्षाच्या कारकिर्दीनंतर निवृत्तीची घोषणा केलीय. त्यानं ट्विटरवर भावनिक पोस्ट करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलंय. हजभजननं 2015 मध्ये भारतासाठी शेवटचा कसोटी आणि एकदिवसीय सामना खेळला होता. तर, भारताकडून त्यानं अखेरचा टी-20 सामना 2016 मध्ये खेळला होता. तर, हरभजन सिंहच्या कारकिर्दीवर एकदा नजर टाकुयात.
“सर्व चांगल्या गोष्टींचा शेवट असतो. ज्या खेळानं मला आयुष्यात सर्व काही दिले आहे, आज मी त्या खेळाचा निरोप घेतो आहे. ज्यांनी हा 23 वर्षांचा प्रवास सुंदर आणि संस्मरणीय बनवला, मी त्या प्रत्येकाचा आभारी आहे”, अशा आशयाचं हरभजन सिंहनं ट्विट केलंय.
हरभजन सिंहचं ट्वीट-
हरभजन सिंहची कारकिर्द
हरभजन सिंहनं 1998 मध्ये पदार्पण केलं होतं आणि तो अखेरचा 2016 मध्ये निळ्या जर्सीत दिसला होता. त्यानं भारतीय संघासाठी 103 कसोटी सामने, 236 एकदिवसीय सामने आणि 28 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये 417 विकेट्स घेतल्या आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 269 विकेट्सची नोंद आहे. तर, टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्यानं 25 विकेट्स घेतल्या आहेत.
आयपीएलमधील हरभजन सिंहची कारकिर्द
हरभजन सिंहनं 2008 पासून आयपीएलमध्ये खेळण्यास सुरुवात केली. त्यानं आयपीएलमध्ये एकूण 163 सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्यानं एकूण 150 विकेट्स घेतले आहेत. आयपीएलच्या तेराव्या हंगामात त्यानं खेळण्यास नकार दिलाय. त्यानंतर आयपीएलच्या चौदाव्या हंगामात कोलकाताच्या संघानं त्याला खेरदी केलं. परंतु, त्याला जास्त सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. या हंगामात त्याला केवळ तीन सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. या तीन सामन्यात त्याला एकही विकेट्स घेता आली नाही.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha