Happy birthday Neeraj chopra: गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आज वाढदिवस, सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव
Happy birthday Neeraj chopra: त्यानं टोकयो ऑलिम्पिकमधील भालाफेक स्पर्धेच्या दुसऱ्या प्रयत्नात त्यानं 87.58 मीटर भाला फेकून विजय मिळवला होता.
Happy birthday Neeraj chopra: भारताचा भालाफेक स्टार नीरज चोप्रा (Neeraj Chopra) आज (24 डिसेंबर) 24 वर्षांचा झालाय. अॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. तर, अभिनव बिंद्रानंतर वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा दुसरा भारतीय खेळाडू आहे. त्यानं टोकयो ऑलिम्पिकमधील भालाफेक स्पर्धेच्या दुसऱ्या प्रयत्नात त्यानं 87.58 मीटर भाला फेकून विजय मिळवला होता. त्याच्या कामगिरीमुळं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीसह संपूर्ण देशानं त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव केला होता.
नीरजचा जन्म 24 डिसेंबर 1997 मध्ये हरियाणातील पानिपत येथे झालाय. भारतीय लष्करातील एक कनिष्ठ आयोग अधिकारी (JCO), नीरज चोप्रा हे आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्स फेडरेशन्स (IAAF) वर्ल्ड अंडर-२० चॅम्पियनशिप जिंकणारे भारतातील पहिले ट्रॅक आणि फील्ड ऍथलीट आहे.
- नीरजनं 86.47 मीटर थ्रोमध्ये उतरून गोल्ड कोस्ट, ऑस्ट्रेलिया येथे 2018 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण जिंकले होते. कॉमनवेल्थ गेम्समध्ये भालाफेक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला होता.
- त्यानंतर नीरजनं 2016 मध्ये आयएएएफ वर्ल्ड अंडर-20 चॅम्पियनशिपमध्ये 86.48 मीटर थ्रोसह जागतिक कनिष्ठ विक्रम प्रस्थापित केलाय. विश्वविक्रम साधणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला होता.
- 2016 च्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धे त्यानं वैयक्तिक सर्वोत्तम 82.23 मीटर भाला फेकून सुवर्णपदक जिंकलं होतं. मात्र, ऑलिम्पिक पात्रतेसाठी आवश्यक असलेल्या ८३ मीटरपासून थोडा दूर राहिल्यानं त्याला स्पर्धेत सहभागी होता आले नाही.
- नीरजनं बँकॉक येथे 2014 च्या युवा ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत पहिले आंतरराष्ट्रीय रौप्य पदक जिंकले होते.
पंतप्रधानांकडून खेळाडूंचं अभिनंदन-
टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेले सर्व खेळाडू लाल किल्ल्यावरील ध्वजारोहण कार्यक्रमात विशेष पाहुणे म्हणून उपस्थित झाले होते. त्यावेळी नरेंद्र मोदींनी सर्व खेळाडूंचं अभिनंदन केलं होतं. 'या टाळ्या वाजवून ऑलिम्पिक विजेत्यांचा सन्मान करा. या खेळाडूंनी फक्त देशाचा सन्मान वाढवला नाही, तर येणाऱ्या पिढीला दिशा दाखवली आहे.' या शब्दात पंतप्रधानांनी या खेळाडूंचं अभिनंदन केलं होतं.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha