Copa America 2021 : कोपा अमेरिका 2021 स्पर्धेतील सर्वश्रेष्ठ फुटबॉलर ठरले मेस्सी अन् नेमार, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
Copa America 2021 : लिओनेल मेस्सी (Lionel Messi) आणि नेमार (Neymar) ठरले कोपा अमेरिका 2021 स्पर्धेतील सर्वश्रेष्ठ खेळाडू. मेस्सीच्या नेतृत्त्वात अर्जेंटीनाचा ब्राझीलला नमवत 1-0 नं विजय
Copa America 2021 : कोपा अमेरिका 2021 च्या अंतिम सामन्यात अर्जेंटीनाने ब्राझीलचा 1-0 ने पराभव करत किताब आपल्या नावे केला. या विजयासोबतच स्टार फुटबॉलर आणि अर्जेंटीनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीचं स्वप्नही साकार झालं. मेस्सीच्या नेतृत्त्वात अर्जेंटीनानं कोपा अमेरिका 2021चं जेतेपद मिळवलं. तसेच लिओनेल मेस्सीला कोपा अमेरिका 2021 मधील सर्वश्रेष्ठ खेळाडू म्हणून सन्मानित करण्यात आलं आहे. दरम्यान, मेस्सी त्याला दिलेला हा पुरस्कार ब्राझीलचा स्टार खेळाडू नेमारसोबत शेअर करणार आहे.
दक्षिण अमेरिकन फुटबॉलचे संचालक मंडळ कोनमेबोलने लियोनेल मेस्सी आणि नेमारची कोपा अमेरिका 2021 चा सर्वश्रेष्ठ खेळाडू म्हणून सन्मानित करण्यात आलं आहे. कोनमेबोलने जारी केलेल्या वक्तव्यात म्हटलं आहे की, "स्पर्धा अत्यंत उत्कंठावर्धक होती. त्यामुळे केवळ एकच सर्वश्रेष्ठ खेळाडू निवडणं शक्य नव्हतं. कारण या स्पर्धेत दोन सर्वश्रेष्ठ खेळाडू आहेत."
मेस्सीनं कोपा अमेरिका 2021 स्पर्धा धमाकेदार खेळी केली. मेस्सीनं सहा सामन्यांमध्ये चार गोल डागले. एवढंच नाहीतर मेस्सीनं कोपा अमेरिका 2021 स्पर्धेत अर्जेंटीनासाठी पाच गोल डागण्यासाठी मदत केली. त्यातच नेमारनं पाच सामन्यांमध्ये दोन गोल करण्याव्यतिरिक्त तीन गोल करण्यासाठी मदत केली.
तब्बल 28 वर्षांनी कोपा अमेरिका स्पर्धेत अर्जेंटीनाची विजयाला गवसणी
अर्जेंटीनाने कोपा अमेरिका 2021 चा किताब आपल्या नावे केला आहे. अंतिम सामन्यात अर्जेंटिनाच्या संघानं आर्क रायवल्स ब्राझीलचा 1-0 नं परभाव केला. अर्जेंटीनाने जवळपास 28 वर्षांनी कोपा अमेरिकेच्या जेतेपदावर आपलं नाव पटकावलं आहे. यापूर्वी 1993 मध्ये अर्जेंटीनाने हा किताब आपल्या नावे केला होता. स्टार फुटबॉलर आणि अर्जेंटीनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीच्या नेतृत्त्वात संघानं पहिल्यांदाच कोपा अमेरिका स्पर्धेच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. तसेच ही मेस्सीची पहिली आतंरराष्ट्रीय ट्रॉफी आहे. एंजल डि मारियाने 21व्या मिनिटाला सामन्यातील एकमेव गोल डागत संघाला विजय मिळवून दिला.
1993 नंतर अर्जेंटीनाच्या संघानं 4 वेळा कोपा अमेरिकेचा अंतिम सामना जिंकला होता. तसेच एकदा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही संघ पोहोचला होता. मेस्सीनं जिंकलेली ही पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. तर ब्राझीलनं आतापर्यंत 9 वेळा कोपा अमेरिका स्पर्धेत विजय मिळवला आहे. ब्राझीलनं 2019 मध्ये कोपा अमेरिका स्पर्धेचं जेतेपद पटकावलं होतं. परंतु, यंदा कोपा अमेरिका स्पर्धेचा अंतिम सामना काहीसा खास ठरला. या अंतिम सामन्यात फुटबॉल विश्वातील दोन दिग्गज खेळाडू एकाच मैदानात एकमेकांविरोधात खेळताना पाहण्याचं भाग्य या सामन्यात फुटबॉल प्रेमींना मिळालं. या सामन्यात मेस्सी आणि नेमार हे 2 फॉरवर्ड एकमेकांविरोधात मैदानावर उतरले होते.
कोपा अमेरिका टूर्नामेंटचा इतिहास
कोपा अमेरिका स्पर्धेला COMMEBOL कोपा अमेरिका असंही म्हटलं जातं. इंग्लिशमध्ये कोपा अमेरिका या शब्दाचा अर्थ आहे अमेरिकन कप. 1975 पर्यंत या स्पर्धेला साऊथ अमेरिकन फुटबॉल चॅम्पियनशिपच्या नावानं ओळखलं जातं. ही टूर्नामेंट साऊथ अमेरिका संघांमध्ये खेळवण्यात येते.
1990 नंतर यामध्ये नॉर्थ अमेरिकेतील संघांचाही समावेश करण्यात आला. ही जगातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा म्हणून ओळखली जाते. याची सुरुवात 1910 पासून झाली होती. फुटबॉल वर्ल्ड कप आणि युरो कपनंतर कोपा अमेरिका ही तिसरी सर्वाधिक पाहिली जाणारी फुटबॉल स्पर्धा आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :