CWG 2022: कॉमनवेल्थमध्ये भारताचं आणखी एक पदक निश्चित; तुलिका मानची ज्युदोच्या अंतिम फेरीत धडक
CWG 2022: बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारताचं आणखी एक पदक निश्चित झालंय.
CWG 2022: बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारताचं आणखी एक पदक निश्चित झालंय. भारतीय महिला ज्युदोपटू तुलिका माननं (Tulika Maan) 78 किलोग्राम वजनी गटाच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडच्या सिडनी अँड्र्यूजचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. तसेच तुलिकानं रौप्यपदकावर कब्जा केलाय. परंतु, अंतिम सामन्यात विजय मिळवून देशासाठी सुवर्णपदक जिंकण्याचा तिचा प्रयत्न असेल.
ट्वीट-
ज्युदोमध्ये भारताचं तिसरं पदक
ज्युदोमधील भारताचं हे तिसरं पदक असेल. यापूर्वी सुशीला देवी लिकमाबम आणि विजय कुमार यादव यांनी ज्युदोमध्ये भारतासाठी पदकं जिंकली आहेत. कॉमवेल्थ स्पर्धेच्या चौथ्या दिवशी सुशीला देवी लिकमाबम हिने ज्युदोच्या 48 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकलंय. 78 किलोग्राम वजनी गटात तुलिका माननं रौप्यपदक निश्चित केलंय. पण अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या मिचेला व्हाईटबोईला पराभूत करून रौप्यपदकाचं रुपातंर सुवर्णपदकात करण्यासाठी ती मैदानात उतरणार आहे.
विजय कुमार यादवची ज्युदोमध्ये दमदार प्रदर्शन
ज्युदोमध्ये भारताच्या विजय कुमार यादवनं भारताला कांस्यपदक मिळवून दिलंय. पुरुषांच्या 60 किलो गटात उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाच्या जोशुआकडून त्याला पराभव पत्करावा लागला होता. यानंतर त्याला रेपेचेज सामन्यांमध्ये संधी मिळाली आणि त्यानं कांस्यपदक जिंकलं.
कॉमनवेल्थमध्ये पदक जिंकलेले भारतीय खेळाडू
सुवर्णपदक- 5 (मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ.)
रौप्यपदक- 5 (संकेत सरगरी, बिंदियाराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ.)
कांस्यपदक- 4 (गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंह.)
हे देखील वाचा-