Commonwealth Games 2022 : कॉमनवेल्थ गेम्ससाठी भारत सज्ज, कधी होणार सामने, कुठे पाहाल स्पर्धा, वाचा सविस्तर
Commonwealth Games 2022 मध्ये भारताचे 215 खेळाडू 16 वेगवेगळ्या खेळांमध्ये सहभागी होणार आहेत. भारतीय खेळ प्राधिकरणाने भारतीय खेळाडूंचा जोश वाढवण्यासाठी #Create4India अभियानही सुरु केलं आहे.
CWG Opening Ceremony Live Streaming : राष्ट्रमंडल खेळ 2022 अर्थात कॉमनवेल्थ गेम्स 2022 (Commonwealth Games 2022) सुरु होण्यासाठी काही दिवसचं शिल्लक आहेत. 28 जुलै रोजी खेळांना सुरुवात होणार आहे. कॉमनवेल्थ गेम्स 2022 चं आयोजन इंग्लंडच्या बर्मिंघहममध्ये होणार आहे. 28 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान पार पडणाऱ्या या स्पर्धेत भारताचे 215 खेळाडू 16 विविध खेळांमध्ये सहभागी होतील. यावळी भारतीय खेळ प्राधिकरणाने भारतीय खेळाडूंचा जोश वाढवण्यासाठी #Create4India अभियानही सुरु केलं आहे.
सोनी लाईव्हवर होणार थेट प्रक्षेपण
भारतात कॉमनवेल्थ स्पर्धेचं लाईव्ह ब्रॉडकास्ट सोनी पिक्चर्स नेटवर्क (Sony TV) वर केलं जाणार आहे. त्यामुळे भारतीय दर्शक Commonwealth Games 2022 चं लाईव्ह ब्रॉडकास्ट Sony TEN 1, Sony TEN 2, Sony TEN 3, Sony SIX आणि Sony TEN 4 चॅनलवर पाहू शकतात. याशिवाय कॉमनवेल्थ खेळांचं मोबाईलवर लाईव्ह स्ट्रीमिंग Sony Liv या अॅपवर होणार आहे.
2018 मध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर
कॉमनवेल्थ गेम्स खेळांमध्ये भारताच्या प्रदर्शनाचा विचार करता याआधी 2010 साली भारताने सर्वोत्कृष्ट प्रदर्शन केलं होतं. त्यावर्षी भारतातच Commonwealth Games चं आयोजन झालं होतं. दिल्लीमध्ये पार पडलेल्या या सामन्यांमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर होता. पहिल्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा संघ होता. कॉमनवेल्थ गेम्स 2010 मध्ये भारताने 101 पदकं जिंकली होती. ज्यामध्ये 38 सुवर्णपदकं होती. त्यानंतर 2018 साली भारताने 64 पदकं मिळवत कॉमनवेल्थ गेम्समध्ये तिसरं स्थान मिळवलं मेडल.
हे देखील वाचा-
- Commonwealth Games 2022 : कॉमनवेल्थ गेम्ससाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा, हरमनप्रीत कर्णधार, तर मंधाना उपकर्णधार
- Commonwealth Games 2022 : ऑलिम्पिकवीर नीरज चोप्रासह 37 खेळाडू कॉमनवेल्थ गेम्ससाठी सज्ज; बर्मिंगहममध्ये रचणार इतिहास
- Commonwealth Games 2022 : आगामी कॉमनवेल्थ गेम्ससाठी 'या' भारतीय महिला कुस्तीपटूंची निवड, इंग्लंडमध्ये रंगणार स्पर्धा