Commonwealth Games 2022: निकहत जरीन पोहोचली सेमीफायनलला, वेल्सच्या हेलन जोन्सचा केला पराभव
Commonwealth Games 2022: राष्ट्रकुल क्रीडा 2022 चा सहावा दिवस देखील भारतासाठी उत्कृष्ट ठरला. भारतीय महिला बॉक्सर निकहत जरीनने (Nikhat Zareen) सामना जिंकला आहे.
Nikhat Zareen: 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा (Commonwealth Games 2022) स्पर्धेत भारतीय खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी दिसून येत आहे. भारतीय महिला बॉक्सर निकहत जरीनने (Nikhat Zareen) सामना जिंकला आहे. निकहत जरीनने महिला बॉक्सिंग लाईट फ्लायवेट प्रकारात (Women’s boxing light flyweight category) वेल्सच्या हेलन जोन्सचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. या सामन्यात निकहत जरीनने वेल्सच्या हेलन जोन्सचा 5-0 असा पराभव केला.
निकहत जरीनचा सहज विजय
बॉक्सर निकहत जरीन ही शेवटचे आठ सामने जिंकणारी तिसरा भारतीय बॉक्सर आहे. त्याचवेळी, याशिवाय, 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक जिंकणारी निकहत जरीन ही तिसरी भारतीय बॉक्सर आहे. निकहत जरीननंतर आता लव्हलिना बोरगोहेनही आज मैदानात दिसणार आहे. लोव्हलिना बोर्गोहेन महिलांच्या लाइट मिडलवेट प्रकारात उपांत्यपूर्व फेरी म्हणजेच क्वार्टर फायनल खेळेल.
#CommonwealthGames2022 | Nikhat Zareen beats Helen Jones of Wales to move into the semi-finals of Women's 48-50kg category; also confirms a medal for India in boxing pic.twitter.com/NEvWCxNuOB
— ANI (@ANI) August 3, 2022
तुलिका मानने ज्युदोमध्ये रौप्यपदक जिंकले
राष्ट्रकुल क्रीडा 2022 चा सहावा दिवस देखील भारतासाठी उत्कृष्ट ठरला. तुलिका मानने ज्युदोमध्ये भारतासाठी रौप्य पदक जिंकले. तिने ज्युदोच्या महिलांच्या 78 किलो गटात रौप्य पदक जिंकले. मात्र, तुलिकाचे सुवर्णपदक हुकले. तुलिका मानला अंतिम सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले.
कॉमनवेल्थमध्ये पदक जिंकलेले भारतीय खेळाडू
सुवर्णपदक- 5 (मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ.)
रौप्यपदक- 6 (संकेत सरगरी, बिंदियाराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान)
कांस्यपदक- 7 (गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंह, सौरव घोषाल, गुरजीत सिंह, तेजस्वीन शंकर)
हे देखील वाचा-