CWG Medal Tally 2022: कॉमनवेल्थ स्पर्धेच्या पदकतालिकेत भारताची टॉप-10 मध्ये एन्ट्री, अव्वल कोण?
Commonwealth Games 2022 Medal Tally: बर्मिंगहॅम येथे शुक्रवारपासून कॉमनवेल्थ स्पर्धेला (Commonwealth Games 2022) सुरूवात झालीय.
Commonwealth Games 2022 Medal Tally: बर्मिंगहॅम येथे शुक्रवारपासून कॉमनवेल्थ स्पर्धेला (Commonwealth Games 2022) सुरूवात झालीय. या स्पर्धेत आतापर्यंत 39 पदकावर विविध देशांतील खेळाडूंनी नाव कोरलंय. कॉमनवेल्थ स्पर्धेच्या पदकतालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वल स्थानी आहे. या स्पर्धेतील पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियानं 8 सुवर्णपदकांसह 16 पदकं जिंकली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत 5 सुवर्णपदकासह 16 पदक जिंकली. तर, दुसऱ्या दिवशीही भारतीय खेळाडूंनी आपली छाप सोडत देशासाठी पदक जिंकली आहेत्. ज्यात एक सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्यपदक आहे. भारतानं हे चारही पदक वेटलिफ्टिंगमध्ये जिंकली आहेत. या कामगिरीसह भारतानं पदतालिकेच्या टॉप-10 मध्ये स्थान मिळवलंय.
बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ स्पर्धेच्या पदकतालिकेत ऑस्ट्रेलिया 13 सुवर्णपदकांसह अव्वल स्थानी आहे. त्यानंतर न्यूझीलंड दुसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडनं आतापर्यंत 7 सुवर्णपदक जिंकले आहेत. 5 सुवर्णपदकांसह इंग्लंड तिसऱ्या क्रमांकावर आहे. या स्पर्धेत 72 देशांनी सहभाग घेतला असून आतापर्यंत एकूण 20 देशांना पदक जिंकता आलं नाही. पदतालिकेत कोणकोणत्या देशाचा समावेश आहे. हे पाहुयात.
कॉमनवेल्थ 2022 पदकतालिका-
क्रमांक | देश | सुवर्ण | रौप्य | कांस्य | एकूण |
1 | ऑस्ट्रेलिया | 13 | 8 | 11 | 32 |
2 | न्यूझीलंड | 7 | 4 | 2 | 13 |
3 | इंग्लंड | 5 | 12 | 4 | 21 |
4 | कॅनाडा | 3 | 3 | 5 | 11 |
5 | स्कॉटलँड | 2 | 4 | 6 | 12 |
6 | मलेशिया | 2 | 0 | 1 | 3 |
7 | दक्षिण अफ्रिका | 2 | 0 | 0 | 2 |
8 | भारत | 1 | 2 | 1 | 4 |
9 | बरमुडा | 1 | 0 | 0 | 1 |
10 | नायजेरिया | 1 | 0 | 0 | 1 |
हे देखील वाचा-
- Bindyarani Devi: वेटलिफ्टिंगमध्ये बिंद्याराणी देवीची धडाकेबाज कामगिरी, देशासाठी रौप्यपदक जिंकलं, भारताच्या खात्यात चौथं पदक
- Mirabai Chanu Wins Gold : मीराबाई चानूची सुवर्ण कामगिरी, भारताच्या खात्यात सुवर्णपदक, स्पर्धेतील पदकसंख्या तीनवर
- Sanket Sargar wins silver medal : स्पॉंडिलायसिससारख्या गंभीर दुखापतीशी झुंज, वयाच्या 21 व्या वर्षी रौप्य पदकाला गवसणी