IND vs GHA, Men's Hockey: भारतीय हॉकी संघाची दणक्यात सुरुवात, पहिल्याच सामन्यात घानाला 11-0 नं नमवलं
बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारतीय पुरुष हॉकी संघानं (India Men's Hockey Team) त्यांच्या गटातील पहिल्याच सामन्यात सामन्यात घानाचा (IND vs GHA) 11-0 असा पराभव केलाय.
IND vs GHA, Men's Hockey: बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारतीय पुरुष हॉकी संघानं (India Men's Hockey Team) त्यांच्या गटातील पहिल्याच सामन्यात सामन्यात घानाचा (IND vs GHA) 11-0 असा पराभव केलाय. या सामन्यात भारतासाठी आठ वेगवेगळ्या खेळाडूंनी गोल केले. भारतीय हॉकी संघाचा उपकर्णधार हरमनप्रीत सिंह (Harmanpreet Singh) सर्वाधिक तीन गोल केले. हा भारतीय कर्णधार मनप्रीत सिंहचा (Manpreet Singh) 300 वा आणि हरमनप्रीत सिंहचा 150 वा आंतरराष्ट्रीय सामना होता.
पहिल्याच सामन्यात भारतीय हॉकी संघाचं जबरदस्त प्रदर्शन
पहिल्या क्वार्टरमध्ये तीन गोल करत भारतानं घानावर 3-0 अशी आघाडी घेतली. भारतासाठी अभिषेक, हरमनप्रीत आणि शमशेननं गोल केलं. दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारतानं आणखी दोन गोल करत 5-0 अशी आघाडी घेतलीय. त्यानंतर तिसऱ्या क्वार्टरमध्ये तीन आणि चौथ्या क्वार्टरमध्ये दोन गोल करत भारतानं घानावर 11-0 असा विजय नोंदवून कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेत विजयी सुरुवात केली. कॉमनवेल्थ स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात भारतानं दमदार प्रदर्शन करून दाखवलंय.
कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताकडून पदकाची अपेक्षा
भारताच्या गटात घानाशिवाय इंग्लंड, वेल्स आणि कॅनडाचे संघ आहेत. घानानंतर भारताचा पुढील सामना सोमवारी यजमान इंग्लंडशी होणार आहे. यानंतर भारतीय संघ येत्या 3 ऑगस्टला कॅनडाशी भिडणार आहे. तर, 4 ऑगस्टला वेल्सशी गटातील अखेरचा सामना खेळेल. सध्या बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाकडून पदकाची अपेक्षा केली जात आहे.
भारतीय महिला हॉकी संघाचा वॉल्सवर 3-1 नं विजय
कॉमनवेल्थ बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघ सातत्यानं दमदार प्रदर्शन करताना दिसत आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात घानाला धुळ चाखल्यानंतर भारतीय महिला संघानं वॉल्सचाही पराभव केलाय. वॉल्सविरुद्ध शनिवारी खेळण्यात आलेल्या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघानं 3-1 अशा फरकानं विजय मिळवलाय. भारतीय महिला हॉकी संघाचा या स्पर्धेतील सलग दुसरा विजय आहे. भारतीय महिला हॉकी संघाचा पुढचा सामना इंग्लंडशी (2 ऑगस्ट) खेळणार आहे.
हे देखील वाचा-