(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Commonwealth 2022 मध्ये पदकं मिळवण्यात कुठल्या राज्याचे खेळाडू पुढे, हरयाणा-पंजाब अव्वल,महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर?
CWG 2022 : कॉमनवेल्थ स्पर्धा 2022 मध्ये भारत चौथ्या स्थानी राहिला असून भारताने एकूण 61 पदकांवर यंदा नाव कोरलं. यामध्ये 22 सुवर्णपदकं, 16 रौप्यपदकांसह 23 कांस्यपदकांचा समावेश होता.
India Medal Tally : इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये कॉमनवेल्थ स्पर्धा (Commonwealth Games 2022) नुकतीच पार पडली. भारताने यंदा 61 पदकांवर यंदा नाव कोरत चौथं स्थान मिळवलं. विविध खेळात भारताच्या विविध खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. दरम्यान राज्यनिहाय विचार करता बहुतेक राज्याच्या खेळाडूंनी पदकं मिळवली असली तर हरयाणा आणि पंजाबच्या सर्वाधिक खेळाडूंनी पदकांना गवसणी घालत अप्रतिम कामगिरी केली. या यादीत महाराष्ट्र 7 पदकांसह पाचव्या स्थानी आहे.
भारताने कॉमनवेल्थ स्पर्धा 2022 मध्ये 22 सुवर्णपदकं, 16 रौप्यपदकांसह 23 कांस्यपदक मिळवत 61 पदक खिशात घातली. दरम्यान यावेळी राज्यनिहाय पदकांचा विचार करता सर्वाधिक म्हणजेच 24 पदकं हरयाणाच्या खेळाडूंनी मिळवली. तर 18 पदकं पंजाबला मिळाली. यानंतर दिल्ली आणि झारखंड यांनी प्रत्येकी 8 तर महाराष्ट्राने 7 तर तेलंगना 6 आणि केरळ-तामिळनाडूने अनुक्रमे 5 आणि 4 पदक मिळवली. तसंच गुजरातने 4 तर चंदीगड, मणिपूर आणि उत्तराखंडने प्रत्येकी 3 विकेट्स मिळवले, कर्नाटक, उत्तर प्रदेश, मिझोरम आणि ओडिसा यांनी प्रत्येकी दोन पदकं जिंकली. तर मध्य प्रदेश, आंध्रप्रदेश, आसाम, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल आणि हैद्रबादमधील खेळाडूंनी प्रत्येकी एक पदक जिंकलं.
भारतासाठी पदक जिंकलेल्या खेळाडूंची यादी
सुवर्णपदक- 22
मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ, सुधीर, बजरंग पुनिया, साक्षी मलिक, दीपक पुनिया, रवी दहिया, विनेश फोगट, नवीन, भाविना पटेल, नीतू घणघस, अमित पंघाल, एल्डहॉस पॉल, निकहत जरीन, शरथ-श्रीजा, पीव्ही सिंधू, लक्ष्य सेन, बॅडमिंटन पुरुष दुहेरी संघ, शरथ कमाल
रौप्यपदक- 15
संकेत सरगर, बिंद्याराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान, मुरली श्रीशंकर, अंशू मलिक, प्रियंका गोस्वामी, अविनाश साबळे, पुरुष लॉन बॉल संघ, अब्दुल्ला अबोबकर, शरथ-साथियान, महिला क्रिकेट संघ, सागर, पुरुष हॉकी संघ.
कांस्यपदक- 23
गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंह, सौरव घोषाल, गुरदीप सिंह, तेजस्वीन शंकर, दिव्या काकरन, मोहित ग्रेवाल, जास्मिन, पूजा गेहलोत, पूजा सिहाग, मोहम्मद हुसामुद्दीन, दीपक नेहरा, रोहित टोकस, महिला हॉकी संघ , संदीप कुमार, अन्नू राणी, सौरव-दीपिका, किदम्बी श्रीकांत, त्रिशा-गायत्री, साथियान गनसेकरन
हे देखील वाचा-