एक्स्प्लोर
Advertisement
टीम इंडिया इंग्लंडमध्ये, केदार जाधव आणि रोहित शर्मा भारतातच!
मुंबई : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया इंग्लंडमध्ये दाखल झाली आहे. मात्र टीम इंडियाचे दोन शिलेदार रोहित शर्मा आणि केदार जाधव सध्या भारतातच आहेत.
सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा त्याच्या कुटुंबातील एका लग्न सोहळ्यासाठी मुंबईतच थांबला आहे. त्यामुळे टीमसोबत तो लंडनला जाऊ शकला नाही. बीसीसीआयला त्याने याबाबतची माहिती अगोदरच दिली होती.
केदार जाधवला व्हिसा उशीरा मिळाल्यामुळे तो टीम इंडियासोबत इंग्लंडमध्ये जाऊ शकला नाही. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार टीम इंडियाचे हे दोन्हीही शिलेदार लवकरच टीम इंडियाच्या ताफ्यात सहभागी होणार आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफीत टीम इंडियाचा पहिला सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत होणार आहे. 4 जून रोजी हा सामना खेळवला जाईल. 8 जूनला श्रीलंकेसोबत भारताचा सामना असेल, तर 11 जून रोजी भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.
दरम्यान या सामन्यांपूर्वी टीम इंडिया दोन सराव सामने खेळणार आहे. पहिला सराव सामना 28 मे रोजी न्यूझीलंडविरुद्ध होईल. तर दुसरा सराव सामना 30 मे रोजी बांगलादेशविरुद्ध होणार आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 8 संघ सहभागी होणार आहेत. दोन गटांमध्ये संघांचं विभाजन करण्यात आलं आहे.
पहिल्या गटामध्ये इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश या संघांचा समावेश आहे. तर दुसऱ्या गटामध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश आहे. सर्व संघ प्रत्येकी 3 सामने खेळतील आणि गटातील वरील दोन संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरतील.
- ग्रुप ए : ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश, इंग्लंड, न्यूझीलंड
- ग्रुप बी : भारत, पाकिस्तान, द. आफ्रिका, श्रीलंका
- जून 1: इंग्लंड Vs बांगलादेश
- जून 2: ऑस्ट्रेलिया Vs न्यूझीलंड
- जून 3: श्रीलंका Vs दक्षिण अफ्रिका
- जून 4: भारत Vs पाकिस्तान
- जून 5: ऑस्ट्रेलिया Vs बांगलादेश
- जून 6: न्यूझीलंड Vs इंग्लंड
- जून 7: पाकिस्तान Vs दक्षिण अफ्रिका
- जून 8: भारत Vs श्रीलंका
- जून 9: न्यूझीलंड Vs बांगलादेश
- जून 10: इंग्लंड Vs ऑस्ट्रेलिया
- जून 11: भारत Vs दक्षिण अफ्रिका
- जून 12: श्रीलंका Vs पाकिस्तान
- जून 14: पहिली सेमीफाइनल (A1 Vs B2)
- जून 15: दूसरी सेमीफाइनल (A2 Vs B1)
- जून 18: अंतिम सामना
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ जाहीर
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संदीप पाटील यांनी निवडलेला संघ
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ जाहीर
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी वीरेंद्र सेहवागची टीम!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement