(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BCCI AGM 2020: माजी कसोटीवीर चेतन शर्मा बीसीसीआय निवड समितीचे नवे अध्यक्ष
बीसीसीआयच्या सीनियर निवड समितीच्या अध्यक्षपदी माजी कसोटीपटू चेतन शर्मा यांची नियुक्ती.शर्मा यांच्यासह ॲबी कुरुविला आणि देबाशीष मोहंती यांचाही निवड समितीत समावेश.
माजी कसोटीवीर चेतन शर्मा यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. चेतन शर्मा सध्याचे अध्यक्ष सुनील जोशी यांची जागा घेतील. बीसीसीआयने (BCCI) गुरुवारी आभासी परिषदेदरम्यान अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीच्या नियुक्त्यांची घोषणा केली.
मदन लाल यांच्या क्रिकेट सल्लागार समितीने (CAC), रुद्र प्रताप सिंह आणि सुलक्षणा नाईक यांनी अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीच्या तीन सदस्यांची निवड केली. चेतन शर्मा एकदिवसीय सामन्यात प्रथमच भारताकडून हॅटट्रिक घेण्यासाठी ओळखला जातात. वरिष्ठ निवड समितीच्या तीन सदस्यांची निवड करण्यासाठी समितीने गुरुवारी ऑनलाइन मुलाखती घेतल्या होत्या.
The Cricket Advisory Committee (CAC) comprising Mr Madan Lal, Mr Rudra Pratap Singh and Ms Sulakshana Naik met virtually to select three members of the All-India Senior Selection Committee (Men).
— BCCI (@BCCI) December 24, 2020
बीसीसीआयने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शर्मा यांच्यासह ॲबी कुरुविला आणि देबाशीष मोहंती यांचाही निवड समितीत समावेश. सुनील जोशी आणि हरविंदरसिंग निवड यांना समितीत कायम ठेवण्यात आले आहे.
बीसीसीआयने एका निवेदनात म्हटले आहे की, "समितीने ज्येष्ठतेच्या (एकूण कसोटी सामन्यांची संख्या) आधारे पुरुष सीनियर क्रिकेट निवड समितीच्या अध्यक्षपदी चेतन शर्मा यांच्या नावाची शिफारस केली. क्रिकेट सल्लागार समिती (सीएसी) एक वर्षाच्या कालावधीनंतर उमेदवारांचा आढावा घेईल आणि बीसीसीआयकडे याची शिफारस करेल."
संबंधित बातमी :
आता आयपीएलमध्ये 10 संघ खेळणार, BCCI च्या एजीएम बैठकीत निर्णय