(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आता आयपीएलमध्ये 10 संघ खेळणार, BCCI च्या एजीएम बैठकीत निर्णय
आता 2022 पासून आयपीएलमध्ये 10 संघ खेळणार आहेत. आज बीसीसीआयच्या एजीएम बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
अहमदाबाद : आता 2022 पासून आयपीएलमध्ये 10 संघ खेळणार आहेत. अहमदाबाद येथे आज झालेल्या बीसीसीआयच्या एजीएम बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत 8 संघ खेळत आहेत.
दहा संघांचे आयपीएलमध्ये 94 सामने असतील ज्यासाठी सुमारे अडीच महिने लागणार आहेत. याचा परिणाम आंतरराष्ट्रीय क्रिकेट वेळापत्रकावर होण्याची शक्यता आहे.
BCCI general body approves 10-team IPL from 2022 edition at its AGM in Ahmedabad
— Press Trust of India (@PTI_News) December 24, 2020
यासह आयपीएलच्या संपूर्ण कालावधीसाठी दिग्गज परदेशी खेळाडूंची उपलब्धता सुनिश्चित करणेही आवश्यक आहे. प्रसारणाची रक्कम दर वर्षी 60 सामन्यांसाठी असते. आता पुन्हा नव्याने याचं नियोजन करावे लागणार आहे. सध्या स्टार इंडियाने सन 2018-2022 दरम्यानच्या कालावधीसाठी 16,347.50 कोटी रुपये दिले आहेत. ही किंमत दरवर्षी होणाऱ्या 60 सामन्यांसाठी आहे.
गौतम अदानी आणि संजीव गोएंका (माजी फ्रेंचायझी राइझिंग पुणे सुपरगिजंट्सचे मालक) ही काही मोठी नावे आहेत ज्यांना संघ खरेदी करण्यात रस आहे.
एजीएमचे इतर निर्णय बीसीसीआयच्या सूत्रानुसार, कोरोना महामारीमुळे घरी राहावं लागलेल्या सर्व प्रथम श्रेणी क्रिकेटपटूंना (पुरुष आणि महिला दोघांनाही) योग्य मोबदला दिला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) काही स्पष्टीकरण दिल्यानंतर बीसीसीआय 2028 च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) समर्थन करेल, असे सूत्रांनी सांगितले.संबंधित बातम्या :
Boxing day test: कसं पडलं 'बॉक्सिंग डे टेस्ट' नाव, काय आहे यामागचा इतिहास?
अजिंक्य रहाणेकडे संघाचं नेतृत्त्व सोपवून विराट भारताच्या दिशेने रवाना, संपूर्ण टीमला खास मेजेस