BWF World Tour Final : पीव्ही सिंधूचं गोल्ड थोडक्यात हुकलं, BWF वर्ल्ड टूर फायनलमध्ये कोरियन खेळाडूंकडून मात
BWF World Tour Final : भारताची आघाडीची महिला टेनिसपटू पीव्ही सिंधू BWF वर्ल्ड टूर फायनल्सच्या अंतिम लढतीत कोरियाच्या अन सेउंगकडून पराभूत झाली आहे. त्यामुळे तिला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं आहे.
BWF World Tour Final : जागतिक टेनिस विश्वातील आघाडीची महिला टेनिसपटू पीव्ही सिंधू (PV Sindhu) भारताच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट महिला टेनिसपटू आहे. सलग दोन वेळा ऑलिम्पिकपदक मिळवणारी एकमेव भारतीय महिला असणाऱ्या सिंधूने आणखी एक रौप्य पदक खिशात घातले आहे. BWF वर्ल्ड टूरमघध्ये (BWF Tour Finals) सिंधू अंतिम सामन्यात पराभूत झाल्यामुळे तिचं सुवर्णपदक हुकलं असून तिला दुसऱ्या स्थानावर रौप्यपदकासह समाधान मानावं लागलं आहे. सिंधूला दक्षिण कोरियाच्या एन सेयुंगने (AN Seyoung) मात दिली आहे.
असा झाला सामना
पीव्ही सिंधू आणि एन सेयुंग यांच्यातील सामना सुरुवातीपासूनच एकतर्फी होत होता. एन सेयुंगने सुरुवातीपासून आपला दबदबा कायम ठेवला. ज्यामुळे सिंधूला सामन्यात आगमन करण्याचा वेळ मिळालाच नाही. सामन्यातील पहिला सेट 21-16 च्या फरकाने सेयुंगने जिंकला. ज्यानंतर सामन्यात टिकून राहण्यासाठी सिंधूला दुसरा सेट जिंकण अनिवार्य होतं. पण तो सेटही सेयुंगने 21-12 च्या फरकाने जिकंत सेट आणि सामना स्वत:च्या नावे केला. त्यामुळे सिंधूला महत्त्वाचा सामना गमावावा लागला असून तिचं विजयाचं स्वप्न पुन्हा एकदा हुकलं आहे.
ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाची कमाई
यंदाच्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्णपदक तर मिळवलंच पण इतर खेळाडूंनीही चमकदार कामगिरी केली. सिंधूनेही सुरुवातीपासून उत्तम खेळ दाखवला. पण महत्त्वाच्या सामन्यात पराभूत झाल्यामुळे सिंधूचं फायनलमध्ये जाण्याचं स्वप्न अधुरं राहिलं. ज्यानंतर तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात विजय मिळवत सिंधूने कांस्यपदक खिशात घातला.
हे देखील वाचा-
- Happy Birthday Shikhar Dhawan: हॅप्पी बर्थडे गब्बर! 'शिखर' गाठणाऱ्या धवनबाबत खास गोष्टी माहिती आहेत का?
- IND vs NZ Live Updates: भारताचा डाव घोषित, न्यूझीलंडसमोर 539 धावांचा डोंगर
- Ind Vs NZ: कानपूरमध्ये श्रेयस अय्यर, मुंबईत मयांक अग्रवाल; न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत दमदार कामगिरी