एक्स्प्लोर

पंड्या आणि राहुलचे निलंबन मागे, भारतीय संघात पुनरागमन

सर्वोच्च न्यायालयाकडून नियुक्त अॅमिकस क्युरी पी. एस. नरसिंह यांच्याशी चर्चा करुनच बीसीसीआयच्या प्रशासकांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हार्दिक पंड्या न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होऊ शकतो, तर केएल राहुल राष्ट्रीय क्रिकेटमध्ये किंवा भारत 'अ' संघाकडून खेळू शकतो.

मुंबई : 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमातल्या महिलांविषयीच्या आक्षेपार्ह विधानांप्रकरणी हार्दिक पंड्या आणि केएल राहुल यांच्यावर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई बीसीसीआयच्या प्रशासकांनी दोन आठवड्यांनी मागे घेतली आहे. सध्या सुरु असलेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेसाठी निवड समितीने हार्दिक पंडयाचा भारतीय संघामध्ये समावेश केला आहे. तर केएल राहुलचा भारतीय ‘अ’ संघात समावेश केला आहे. या बद्दलची माहिती बीसीसीआयने दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून नियुक्त अॅमिकस क्युरी पी. एस. नरसिंह यांच्याशी चर्चा करुनच बीसीसीआयच्या प्रशासकांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हार्दिक पंड्या न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होऊ शकतो, तर केएल राहुल राष्ट्रीय क्रिकेटमध्ये किंवा भारत 'अ' संघाकडून खेळू शकतो. दरम्यान, या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या लोकपालांकडून पंड्या आणि राहुल यांची चौकशी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात पाच फेब्रुवारीला होत असलेल्या सुनावणीत लोकपालांची नियुक्ती करण्यात येईल. न्यूझीलंड विरुद्ध सुरु असलेल्या मालिकेत भारताने सध्या 1-0 अशी आघाडी घेतली आहे. तर कर्णधार विराट कोहलीला शेवटच्या दोन वनडेसाठी विश्रांती देण्यात येणार आहे. का केलं बीसीसीआयने हार्दिक पंड्या आणि केएल राहुलचं  निलंबन, काय आहे प्रकरण? 25 वर्षीय हार्दिक पंड्या केएल राहुलसह चित्रपट निर्माता करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या शोमध्ये आला होता. या शोमध्ये त्याने अनेक वादग्रस्त टिप्पणी केल्या होत्या. "एकच मेसेज अनेक मुलींना पाठवण्यात मला काहीच अडचण नाही आणि मी त्यांच्याशी त्यांच्या 'उपलब्ध' असण्याबाबत खुलेआम चर्चा करतो," असं हार्दिकने शोमध्ये सांगितलं. आपण अनेक महिलांसोबत रिलेशनशिप होतो आणि ही बाब पालकांनाही माहित असल्याची कबुली हार्दिक पंड्याने शोमध्ये दिली. तो म्हणाला की, "जेव्हा मी कौमार्य गमावलं, त्यावेळी आई-वडिलांना 'आज मी करुन आलोय' असं सांगितलं होतं. यानंतर सोशल मीडियावर हार्दिक पंड्याविरोधात संतापाची लाट पसरली आहे. या टिप्पणीनंतर सगळ्यांनीच सोशल मीडियावर त्याची शाळा घेतली. आपली चूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्याने बुधवारी एका ट्वीटच्या माध्यमातून खेद व्यक्त करत माफी मागितली. "कॉफी विद करणध्ये माझ्या टिप्पणीमुळे जे दुखावले किंवा ज्यांना अपमान झाल्याचं वाटलं त्या सगळ्यांची माफी मागतो. मी जरा जास्तच बोललो. मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या. सन्मान" संबधित बातम्या करणची कॉफी भोवली, पंड्या आणि राहुल निलंबित राहुल-पंड्याच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर विराटची प्रतिक्रिया हार्दिक आणि राहुलवर दोन वनडे सामन्यांच्या बंदीची शिफारस पंड्या आणि राहुलच्या निलंबनानंतर ‘या’ दोन खेळाडूंची संघात निवड
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

SRH vs RR Eliminator IPL 2026 : 29 चेंडूत वैभव सूर्यवंशीचा महाप्रलय! एलिमिनेटरमध्ये लाजिरवाण्या पराभवानंतर हैदराबाद बाहेर, राजस्थानचे 'रॉयल्स' आता क्वालिफायर-2मध्ये
29 चेंडूत वैभव सूर्यवंशीचा महाप्रलय! एलिमिनेटरमध्ये लाजिरवाण्या पराभवानंतर हैदराबाद बाहेर, राजस्थानचे 'रॉयल्स' आता क्वालिफायर-2मध्ये
SRH vs RR Eliminator IPL 2026 : वैभव सुर्यवंशीच्या वादळी 97 धावा; हैदराबादचा धुव्वा उडवत राजस्थान क्वालिफायर-2 मध्ये
SRH vs RR Eliminator Update : वैभव सुर्यवंशीच्या वादळी 97 धावा; हैदराबादचा धुव्वा उडवत राजस्थान क्वालिफायर-2 मध्ये
Vaibhav Sooryavanshi SRH vs RR Eliminator : 12 षटकार... 29 चेंडूत 97 धावा! वैभव सूर्यवंशीच्या तळपत्या बॅटने अनेक विक्रम मोडले, IPL पाहणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले, पाहा Video
12 षटकार... 29 चेंडूत 97 धावा! वैभव सूर्यवंशीच्या तळपत्या बॅटने अनेक विक्रम मोडले, IPL पाहणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले, पाहा Video
Vaibhav Sooryavanshi: जगातील सर्वात वेगवान शतकाचा मान हुकला, वैभव सूर्यवंशीच्या विकेटने अभिमानाचा हुंदका दाटला!
Video: जगातील सर्वात वेगवान शतकाचा मान हुकला, वैभव सूर्यवंशीच्या विकेटने अभिमानाचा हुंदका दाटला!

व्हिडीओ

BMC Sudhar Samiti Special Report : मध्यरात्रीच्या घडामोडी, शिंदेंवर कुरघोडी? | ABP Majha
Vidhanparishad Election Special Report : अंतिम जागावाटपावर तिन्ही पक्षाचं समाधान कधी? | ABP Majha
NCP Meeting Special Report : आव्हानांचा चक्रव्यूह सुनेत्रा पवार कसा भेदणार? | ABP Majha
Ashok Kharat Movie Special Report : खरात फाईल्स मोठ्या पडद्यावर! | ABP Majha
Amit Deshmukh On Petrol Diesel Crisis : इंधन तुटवड्याच्या प्रश्नावर काय बोलावे हे सरकारकडून शिकावं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime : संतापजनक! केजमध्ये अत्याचारग्रस्त अल्पवयीन मुलीची हेळसांड, आरोग्य तपासणीसाठी दहा तास, तर गुन्हा दाखल होण्यासाठी स्टेशनमध्ये रात्र गेली
संतापजनक! केजमध्ये अत्याचारग्रस्त अल्पवयीन मुलीची हेळसांड, आरोग्य तपासणीसाठी दहा तास, तर गुन्हा दाखल होण्यासाठी स्टेशनमध्ये रात्र गेली
Share Market Today: राजधानी दिल्लीपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या तैवानच्या शेअर बाजाराचा भारताला हादरा; तैवान गुंतवणूकदारांसाठी पहिली पसंती
राजधानी दिल्लीपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या तैवानच्या शेअर बाजाराचा भारताला हादरा; तैवान गुंतवणूकदारांसाठी पहिली पसंती
Rupee vs Yuan : डॉलरनंतर आता चिनी 'युआन'समोर रुपयाची ऐतिहासिक घसरण; आयात महागणार, महागाई वाढण्याची शक्यता
डॉलरनंतर आता चिनी 'युआन'समोर रुपयाची ऐतिहासिक घसरण; आयात महागणार, महागाई वाढण्याची शक्यता
सत्ता जाताच पक्षावरील 'ममता' आटू लागली! तृणमूल खासदाराचा पक्षातील सर्व पदांचा राजीनामा, 100 नगरसेवकांच्या राजीनाम्याची सुद्धा चर्चा
सत्ता जाताच पक्षावरील 'ममता' आटू लागली! तृणमूल खासदाराचा पक्षातील सर्व पदांचा राजीनामा, 100 नगरसेवकांच्या राजीनाम्याची सुद्धा चर्चा
Vaibhav Sooryavanshi: जगातील सर्वात वेगवान शतकाचा मान हुकला, वैभव सूर्यवंशीच्या विकेटने अभिमानाचा हुंदका दाटला!
Video: जगातील सर्वात वेगवान शतकाचा मान हुकला, वैभव सूर्यवंशीच्या विकेटने अभिमानाचा हुंदका दाटला!
DK Shivakumar: संकटमोचक डीकेंची कर्नाटकात स्वप्नपूर्ती होत असतानाच सीएम सिद्धरामय्यांच्या फक्त तीन शब्दातील प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या
संकटमोचक डीकेंची कर्नाटकात स्वप्नपूर्ती होत असतानाच सीएम सिद्धरामय्यांच्या फक्त तीन शब्दातील प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या
मुंबईत चोरलेले सोने काश्मिरच्या डोंगरात लपवलं; कांदिवली पोलिसांनी चोरट्यांना पाक सीमेवरून उचललं
मुंबईत चोरलेले सोने काश्मिरच्या डोंगरात लपवलं; कांदिवली पोलिसांनी चोरट्यांना पाक सीमेवरून उचललं
Iran War Live Update: ट्रम्पकडून दावे सुरुच असताना इराणकडून शांतता करारावर मोठा दावा; तिकडं लेबनाॅनमध्ये इस्त्रायली नरसंहार सुरुच, गेल्या 24 तासांतील 4 मोठ्या घडामोडी...
ट्रम्पकडून दावे सुरुच असताना इराणकडून शांतता करारावर मोठा दावा; तिकडं लेबनाॅनमध्ये इस्त्रायली नरसंहार सुरुच, गेल्या 24 तासांतील 4 मोठ्या घडामोडी...
Embed widget