एक्स्प्लोर

IPL 2021: भारतातच होणार आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचं आयोजन! BCCIकडून मिळाले संकेत

IPL 2021: आयपीएल 14 च्या संदर्भात एक महत्वाचं अपडेट आलं आहे.  भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड आयपीएल 2021 मधील उर्वरित सामन्यांचं आयोजन देशातच करण्याचा विचार करत आहेत.  

IPL 2021: , आयपीएलचा 14वा सीझन कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनिश्चित काळासाठी आयपीएल स्थगित करण्यात आली आहे. तसेच सप्टेंबरमध्ये आयपीएलचं आयोजन पुन्हा केलं जाईल, असं सांगितलं जात आहे. आयपीएल रद्द झाल्यामुळे नाराज झालेले चाहत्यांना आयपीएलचं आयोजन पुन्हा कधी, केव्हा आणि कुठे करण्यात येणार याबाबत उत्सुकताही आहे.  आता क्रिकेट आणि आयपीएल चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आयपीएल 14 च्या संदर्भात एक महत्वाचं अपडेट आलं आहे.  भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड आयपीएल 2021 मधील उर्वरित सामन्यांचं आयोजन देशातच करण्याचा विचार करत आहेत.  

सप्टेंबर महिन्यात होऊ शकतं सामन्यांचं आयोजन

माहितीनुसार, 2021 टी20 वर्ल्ड कपच्या आधी सप्टेंबरमध्ये आयपीएल 2021 मधील उर्वरित सामन्यांचं आयोजन केलं जाऊ शकतं. टी20 विश्वचषकासाठी सर्व संघ भारतात येणार आहेत. अशात बीसीसीआय आयपीएलच्या खेळाडूंना वेळेआधी बोलावून बाकी राहिलेल्या सामन्यांचं आयोजन करु शकते.  बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानं ANI शी बातचीत करताना सांगितलं की, जर देशात सप्टेंबर महिन्यात देशातील कोरोनाची स्थिती कंट्रोलमध्ये आली तर आयपीएलच्या बाकी सामन्यांचं आयोजन भारतात होऊ शकतं. जर विदेशी खेळाडू उपलब्ध होत असतील आणि कोरोनाची स्थिती कंट्रोलमध्ये आली तर निश्चितपणे टी 20 विश्वचषकाआधी आयपीएलचे सामने खेळवू शकतो, असं त्या अधिकाऱ्यानं सांगितलं.  

इंग्लंडमध्ये होऊ शकतं आयोजन

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयपीएलच्या उरलेल्या सामन्यांचं आयोजन इंग्लंडमध्ये केलं जाऊ शकतं. आयपीएलच्या उरलेल्या 31 सामन्यांचं आयोजन करण्यासाठी इंग्लिश काउंटीच्या वतीनं बीसीसीआयला प्रस्ताव देण्यात आला आहे.  

आयपीएलमधील खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानंतर IPL रद्द 

दरम्यान, आयपीएलच्या 14व्या सीझनमध्ये आतापर्यंत 29 सामने पार पडले होते. त्यानंतर काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे आयपीएल रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता आयपीएलचं आयोजन होणार का? झालं तर कुठे होणार आणि कधी होणार? यांसारखे अनेक प्रश्न सध्या चाहत्यांच्या मनात आहेत. 4 मेरोजी मंगळवारी आयपीएल गवर्निंग काउंसिलची तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत बीसीसीआयनं आयपीएल रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. बायो बबलमध्ये असूनही कोरोनाची लागण झाल्यानं बीसीसीआयच्या वतीनं आयपीएलचे उर्वरित सामने अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

महत्त्वाच्या बातम्या

Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
On This Day : इंग्रजांचा भयंकर मारा, पराभवाची टांगती तलवार... अन् तेव्हाच सचिनच्या बॅटने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं; आजच्या दिवशी 1990मध्ये नेमकं काय घडलं होतं?
इंग्रजांचा भयंकर मारा, पराभवाची टांगती तलवार... अन् तेव्हाच सचिनच्या बॅटने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं; आजच्या दिवशी 1990मध्ये नेमकं काय घडलं होतं?
VVS Laxman News : ना कोच, ना चीफ सिलेक्टर... VVS लक्ष्मणच्या हाती BCCI देणार गंभीर-आगरकरांपेक्षा मोठी जबाबदारी; पडद्यामागे नेमकं काय घडतंय?
ना कोच, ना चीफ सिलेक्टर... VVS लक्ष्मणच्या हाती BCCI देणार गंभीर-आगरकरांपेक्षा मोठी जबाबदारी; पडद्यामागे नेमकं काय घडतंय?
Aus Vs Ban 1st Test : रोहित-धोनी-गंभीर-गिलही जे करू शकले नाहीत, ते 25 वर्षांच्या पठ्ठ्याने करून दाखवलं; पहिल्याच डावात ऑस्ट्रेलियाची मस्ती जिरवली, नेमकं काय घडलं?
रोहित-धोनी-गंभीर-गिलही जे करू शकले नाहीत, ते 25 वर्षांच्या पठ्ठ्याने करून दाखवलं; पहिल्याच डावात ऑस्ट्रेलियाची मस्ती जिरवली, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
PM Modi Independence Day speech: भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Embed widget