एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तब्बल 13 वर्षांनी ऑस्ट्रेलियाचा भारतात विजय!
पुणे : ऑस्ट्रेलियाचा पुणे कसोटीतील विजय हा गेल्या तेरा वर्षातला भारतीय भूमीवरचा पहिलाच कसोटी विजय ठरला. याआधी 2004 साली नागपूर कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताला 342 धावांनी हरवलं होतं.
2004 नंतर पुढच्या 11 कसोटींत 9 वेळा ऑस्ट्रेलियाला पराभव स्वीकारावा लागला तर दोन सामने अनिर्णित राहिले होते. पराभवांची ती मालिका स्टीव्हन स्मिथच्या टीमने मोडली. कांगारूंच्या या विजयामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधल्या मालिकेतली चुरसही आणखी वाढली आहे.
विराटला 19 कसोटी सामन्यांनंतर पराभवाची चव
तब्बल 19 कसोटी अपराजित राहिल्यावर भारताला अखेर पराभवाची चव चाखावी लागली आहे. हैदराबाद कसोटीत बांगलादेशवरील विजयानंतर विराट हा भारतातर्फे सलग सर्वाधिक म्हणजे 19 सामने अपराजित राहणारा कर्णधार ठरला होता.
विराटनं माजी क्रिकेटपटू सुनील गावसकरांचा 18 कसोटी सामने अपराजित राहण्याचा विक्रम मोडला होता. पण हा विक्रम आणखी उंचावण्याची किमया विराटला साधता आली नाही.
ऑगस्ट 2015 मध्ये श्रीलंकेविरुद्ध गॉल कसोटीत भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर थेट फेब्रुवारी 2017 मध्ये पुणे कसोटीत ऑस्ट्रेलियानं भारताला हरवलं.
कोहलीची कामगिरी खालावली
पुणे कसोटीत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला दोन्ही डावांत मिळून केवळ 13 धावाच करता आल्या. या कसोटीच्या पहिल्या डावात तर कोहलीला भोपळाही फोडता आला नव्हता. मायदेशातील कसोटी सामन्यांमध्ये कोहलीची ही आजवरची सर्वात खराब कामगिरी ठरली आहे.
विशेष म्हणजे कोहलीनं पुणे कसोटीच्या दोन्ही डावात डावखुऱ्या गोलंदाजांना आपली विकेट बहाल केली. पहिल्या डावात मिचेल स्टार्कनं कोहलीला माघारी धाडलं. तर दुसऱ्या डावात स्टीव्ह ओ’कीफनं विराटला चकवलं.
संबंधित बातम्या :
सलग 19 कसोटी सामने अपराजित राहिलेल्या विराटला पराभवाची चव
IndvsAus – भारत पराभवाच्या छायेत
ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव आटोपला, भारतासमोर 441 धावांचं लक्ष्य
पुण्यात टीम इंडिया गडगडली, कांगारुंकडे 298 धावांची भक्कम आघाडी
#IndvsAus – भारताचा पहिला डाव 105 धावात गुंडाळला
भारत वि. ऑस्ट्रेलिया : पुण्यात चुरशीची लढत
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भंडारा
भविष्य
महाराष्ट्र
Advertisement