(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Africa Cup of Nations game: आफ्रिका कपच्या फुटबॉल सामन्यादरम्यान प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात गर्दी, चेंगराचेंगरीत जवळपास 8 जण मृत्यूमुखी तर 38 हून अधिक जखमी
आफ्रिकेच्या कॅमेरुन येथे सुरु असलेल्या 'आफ्रिका कप ऑफ नेशन्स गेम' स्पर्धेच्या सामन्यादरम्यान मैदानाबाहेर सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने त्याठिकाणी चेंगराचेंगरी झाली आहे.
Africa Cup of Nations game: जगभरात फुटबॉल या खेळाची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात आहे. असाच एका फुटबॉल सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांनी केलेली गर्दी काहींच्या जीवावर बेतली आहे. आफ्रिकेच्या कॅमेरुन येथे 'आफ्रिका कप ऑफ नेशन्स गेम' स्पर्धेच्या सामन्यादरम्यान मैदानाबाहेर सामना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली. पाहता पाहता ही गर्दी इतकी वाढली की त्याठिकाणी चेंगराचेंगरी झाली. ज्यामध्ये अनेकजण जखमी झाले असून आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार आठ जणांचा जीवही गेला आहे.
ही संपूर्ण घटना कॅमेरुनच्या ओलम्बे फुटबॉल मैदानाजवळ घडली आहे. स्पर्धेच्या अंतिम 16 फेरीत यजमान केमेरुन आणि कोमोरोस यांच्यामध्ये सामना खेळवला जात होता. या सामन्यात कॅमेरुनचा सामना कोमोरोसशी असल्याने आपल्या संघाचा खेळ पाहण्यासाठी कॅमेरुनवासियांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. यावेळी सर्वांना मैदानात शिरता आलेल नाही. पाहता पाहता गोंधळ उडाला आणि त्याठिकाणी झालेल्या चेंगराचेंगरीत बरेच जण जखमी झाले. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार 8 जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये एका 14 वर्षीय मुलाचाही समावेश आहे. तर 30 हून अधिकजण जखमी आहेत.
संबधित मैदानाची प्रेक्षक क्षमता 60 हजार असून कोरोनामुळे 80 टक्के प्रेक्षकांनांच प्रवेश दिला जाणार होता. दरम्यान यावेळी 50 हजारांहून अधिक प्रेक्षकांनी सामना पाहण्यासाठी गर्दी केल्याने ही घटना घडल्याचं तेथील अधिकारी सांगत आहेत.
हे देखील वाचा-
- ICC Mens ODI Cricketer of the Year: पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यंदाचा आयसीसी ODI क्रिकेटर
- ICC T20I Player of Year: पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानचं मोठं यश, आयसीसी टी20 प्लेयर ऑफ द इयर म्हणून जाहीर
- ICC T20 World Cup 2022 : आयसीसीकडून टी20 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर; टीम इंडियाचं शेड्यूल पाहा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha