एक्स्प्लोर
Advertisement
Asian Games 2018 : स्वप्ना बर्मननं हेप्टॅथ्लॉन प्रकारात सुवर्णपदक
स्वप्नानं या प्रकारात 6026 गुणांची कमाई करत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. यंदाच्या एशियाडमधलं भारताचं हे अकरावं सुवर्ण पदक ठरलं.
जकार्ता : भारताच्या स्वप्ना बर्मननं हेप्टॅथ्लॉन प्रकारात भारताला एशियाडचं सुवर्णपदक मिळवून दिलं. स्वप्नानं या प्रकारात 6026 गुणांची कमाई करत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. यंदाच्या एशियाडमधलं भारताचं हे अकरावं सुवर्ण पदक ठरलं. हेप्टॅथ्लॉनमध्ये अॅथलेटिक्सच्या सात प्रकारांचा समावेश होतो.
यामध्ये 100 मीटर, 200 मीटर, 800 मीटर धावण्याची शर्यत खेळवली जाते. याशिवाय उंच उडी, लांब उडी आणि भालाफेकीचाही हेप्टॅथ्लॉनमध्ये समावेश असतो. स्वप्नानं या सातही खेळांत सर्वाधिक गुणांची कमाई करत अकरावं सुवर्ण भारताच्या झोळीत टाकलं.
याआधी एशियाडच्या अकराव्या दिवशी भारताच्या अरपिंदर सिंगनं एशियाडमध्ये तिहेरी उडीत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. अरपिंदरनं चौथ्या प्रयत्नात 16.77 मीटरची उडी घेत सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली. अरपिंदर सिंगनं याआधी 2014 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली होती.
भारताच्या द्युती चंदनं एशियाडमध्ये महिलांच्या 200 मीटर्स शर्यतीत रौप्यपदकावर आपलं नाव कोरलं. यंदाच्या एशियाडमधलं द्युतीचं हे दुसरं पदक ठरलं. द्युतीनं 23.20 सेकंदाची वेळ देत रौप्यपदकाची कमाई केली.
शरथ कमल आणि मनिका बत्राला एशियाडमध्ये टेबल टेनिसच्या मिश्र दुहेरी प्रकारात कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. चीनच्या वांग सून आणि यींगशा सून या जोडीनं उपांत्य फेरीत शरथ आणि मनिकाचा 4-1 अशा फरकानं पराभव केला.
भारताच्या खात्यात 54 पदकं
एशियाड स्पर्धेत भारत 54 पदकांसह नवव्या स्थानावर आहे. यामध्ये 11 सुवर्ण, 20 रौप्य आणि 23 कांस्य पदकांचा समावेश आहे. 101 सुवर्णपदकांसह 215 पदकं जिंकणारा चीन स्पर्धेत अव्वल स्थानी आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
भारत
निवडणूक
Advertisement